Get it on Google Play
Download on the App Store

औपसर्गिक रोग

रक्तज, कृमिजन्य, कुष्ठ, ज्वर, राजयक्ष्मा (क्षय), डोळे येणे इ. रोग झालेल्या रोग्याचा स्पर्श झाला किंवा त्या रोग्याच्या वस्तूंशी संपर्क आला, तर संपर्कित व्यक्तीस हे रोग होतात.


अशा रुग्णाच्या शय्येवर वा आसनावर बसणे, त्याची वस्त्रे, फुले इ. वस्तू घेणे, त्याने चंदन इत्यादींची उटी लावल्यास ती घेणे, त्याच्यासह जेवणे, त्याचा स्पर्श, संभोग यांमुळे तसेच त्याच्या निश्वासामुळेही त्याचा रोग दुसऱ्याला जडतो. या रोगांना औपसर्गिक रोग म्हणतात.