Get it on Google Play
Download on the App Store

शांतिपर्व

अंत्येष्टी उरकल्यानंतर बाकीच्या पांडवांसह युधिष्ठिर हस्तिनापुरास आले. युधिष्ठिरांचे मन अत्यंत विषण्ण असतानाच त्यांचा राज्याभिषेक झाला.

नंतर शरपंजरी पडलेल्या भीष्मांकडे कृष्ण आणि युधिष्ठिर समाचारास गेले.


तेथे विषण्ण व वैतागलेल्या युधिष्ठिरांना भीष्मांनी राजधर्म, आपद्‌धर्म आणि मोक्षधर्म यांचा उपदेश केला. नीतिशास्त्र, राजनीतिशास्त्र आणि अध्यात्मविद्या यांचे उत्कृष्ट विवेचन भीष्मांनी शरपंजरी असतानाच केले.