Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

स्त्री पर्व

राजा धृतराष्ट्र आणि गांधारी हे दोघे भयंकर दुःखाने खचले. पती व पुत्र गमावलेल्या सगळ्या वीर स्त्रिया आक्रोश करीत होत्या. संजय आणि विदुर धृतराष्ट्राचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होते.

त्याच सुमाराला पांडव आणि कृष्ण हे धृतराष्ट्राच्या भेटीस आले. पांडवांशी सद्‌भावनेने वागण्याचा उपदेश कृष्णाने धृतराष्ट्रास केला. गांधारीच्या दुःखाला पारावार नव्हता; कारण सगळे पुत्र मारले गेले होते. द्रौपदीनेही सगळे पुत्र गमावले होते. महाभारताच्या  स्त्री पर्वातील गांधारीच्या दुःखाचे करुणामय चित्रण हा शोककाव्याचा उत्कृष्ट नमुना आहे.


गांधारीजवळ श्रीकृष्ण गेला, तेव्हा दुःखतप्त गांधारीने त्याला शाप दिला, की या सर्व संहाराचे मूळ तू आहेस. तुझ्या यादवकुलाचाही असाच निःपात होईल आणि तो तुला आपल्या डोळ्यांनी पहावा लागेल.

युधिष्ठिरांनी मृत वीरांच्या प्रेतांचा अग्निसंस्कार करून तिलांजली दिली.