Get it on Google Play
Download on the App Store

बृहस्पती


देवतांचे पुरोहित बृहस्पती हे भगवान विष्णूंचे भक्त होते. महाभारताच्या आदिपर्वानुसार बृहस्पती हे महर्षी अंगिरा यांचे पुत्र आणि देवतांचे पुरोहित आहेत. बृहस्पतींचा पुत्र काच होता ज्याने शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या शिकून घेतली. देवगुरु बृहस्पतींच्या एका पत्नीचे नाव शुभा आणि दुसरीचे नाव तारा आहे. शुभाला ७ कन्या झाल्या : भानुमती, राका, अर्चिष्मती, महामती, महिष्मती, सिनीवाली आणि हविष्मती. ताराला ७ पूतर्त आणि एक कन्या झाली. त्यांची तिसरी पत्नी ममता हिला भारद्वाज आणि कच नावाचे दोन पुत्र झाले. बृहस्पतींचे आदिदेवता इंद्र आणि प्रत्याधिदेवता ब्रम्हा आहेत. महर्षी अंगिरांची पत्नी कर्मदोषामुळे मातृवात्सा झाली. प्रजापतींचे स्वामी ब्रम्हा यांनी तिला पुंसवन व्रत करायला सांगितले. सनत्कुमार यांच्याकडून व्रतविधी जाणून घेऊन मुनी-पत्नीने व्रत करून भगवंतांना संतुष्ट केले. भगवान विष्णूंच्या कृपेने प्रतिभेचे अधिष्ठाता बृहस्पती तिला पुत्ररूपाने प्राप्त झाले.