Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - ऑक्टोबर १७

भगवंतावाचून भक्ती होत नाही . ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायचाच , त्याचप्रमाणे भक्ती म्हटली की तिथे भगवंत असलाच पाहिजे . भगवंत हा भक्तीचा प्राण आहे . भक्ती आणि माया दोघी भगवंताच्याच स्त्रिया आहेत . पण . म्हणून त्या सवती आहेत . दोन सवती एके ठिकाणी सुखाने नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे . मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी . म्हणजे ती मायेस आपोआप हुसकावून लावते . मायेचे वर्चस्व नाहीसे झाले की आपले काम होऊन जाते .

तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडातरी फरक दिसायला पाहिजे ; तालमीत जाणार्‍याच्या शरीरावर थोडातरी पीळ दिसायला हवा ना ! तसेच , जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे . आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे , त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे . सर्व सृष्टी रामरुप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे . याकरिता अनन्यतेची अत्यंत जरुरी आहे . अनन्यतेतच भक्ती जन्म पावते . द्रौपदीची अनन्यता खरी . भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे , हेच अनन्यतेचे स्वरुप , माझी प्राप्ती करुन घ्यायची असेल तर भक्ती हेच साधन आहे असे स्वतः परमात्म्यानेच सांगितले आहे . जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही , त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही .

समजा , एखाद्या माणसाचे लग्न झाले . तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला ; तरी त्याच्या जीवनांतले इतर व्यवसाय चालूच राहतात . त्याचप्रमाणे , आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतात . जी जी गोष्ट घडेल ती ती आपण भगवंताला सांगावी . भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी , भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे . भक्तीने भगवंत साधतो आणि फलाशा आपोआप कमी होतात . म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावी . ‘ मी देही आहे , ’ असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो ; त्याचप्रमाणे मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरुप होऊन जाऊ . पण हे होण्यासाठी सगुणोपासनेची जरुरी आहे . रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही , त्याप्रमाणे सगुणोपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही . राम कर्ता आहे ही भावना म्हणजेच सगुणोपासना , आणि हेच खर्‍या भक्तीचे स्वरुप आहे . ‘ तू जे देशील ते मला आवडेल ’ असे आपण भगवंताला सांगावे , आणि ‘ माझ्या देवाला हे आवडेल का ? अशा भावनेने जगात वागावे .

ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - ऑक्टोबर १ भगवंत - ऑक्टोबर २ भगवंत - ऑक्टोबर ३ भगवंत - ऑक्टोबर ४ भगवंत - ऑक्टोबर ५ भगवंत - ऑक्टोबर ६ भगवंत - ऑक्टोबर ७ भगवंत - ऑक्टोबर ८ भगवंत - ऑक्टोबर ९ भगवंत - ऑक्टोबर १० भगवंत - ऑक्टोबर ११ भगवंत - ऑक्टोबर १२ भगवंत - ऑक्टोबर १३ भगवंत - ऑक्टोबर १४ भगवंत - ऑक्टोबर १५ भगवंत - ऑक्टोबर १६ भगवंत - ऑक्टोबर १७ भगवंत - ऑक्टोबर १८ भगवंत - ऑक्टोबर १९ भगवंत - ऑक्टोबर २० भगवंत - ऑक्टोबर २१ भगवंत - ऑक्टोबर २२ भगवंत - ऑक्टोबर २३ भगवंत - ऑक्टोबर २४ भगवंत - ऑक्टोबर २५ भगवंत - ऑक्टोबर २६ भगवंत - ऑक्टोबर २७ भगवंत - ऑक्टोबर २८ भगवंत - ऑक्टोबर २९ भगवंत - ऑक्टोबर ३० भगवंत - ऑक्टोबर ३१