Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - ऑक्टोबर १०

नसावें कशाचें ज्ञान । वाटावें सदा घ्यावें रामनाम । प्रपंचीं राखावें समाधान । हेंच भक्ताचें मुख्य लक्षण जाण ॥ डोळे व कान यांनीं होतें बाह्य जगाचें ज्ञान । त्यांना लावावें नामाचें अनुसंधान ॥ राम आणावा चित्तीं । ‘ त्याचा प्रपंच करतों ही राखावी स्मृति ॥ स्वार्थहीन व्हावें आपण । तें होईल करतां परमात्मस्मरण ॥ संधि साधून जो राहिला । तोच जगीं धन्य झाला ॥ नाटकांत नट काम करी जैसें । आपण वर्तत जावें तैसें । राजा रंक होई जरी । तरी मी कोण हे जाणून राहे अंतरीं ॥ जग सज्जन-दुर्जन-मिश्रित । त्यांतून शोधून काढावा अवचित । जो लाभेल संगतीला । रामाचें प्रेम दुणावेल त्याला ॥ द्वेष, मत्सर, अहंकारवृत्ति, । यांची न धरावी संगति ॥ मानापमान करावे सहन । साक्ष ठेवून रामचरण ॥ सर्व काहीं करावें । पण खरें प्रेम साधनावर असावें ॥ अभिमानरहित राहावें । हेंच शिष्याचें लक्षण जाणावें ॥ राम व्हावा माझा । रात्रंदिवस काळजी ठेवीत जा ॥ लक्ष ठेवावें संताकडे । देह लावावा प्रपंचाकडे ॥
गुणांत उत्तम गुण । आपले कळावे अवगुण । अवगुण कळले ज्याला । तो सुधारण्याच्या मार्गाला लागला ॥ प्रथम स्वाधीन करीं आपले मना । सोडावा अहंभाव, विषयवासना । काही पाहिजे हें न वाटावे मना ॥ व्यवहारांत असावें दक्ष । कधीं न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष ॥ दुर्जनाची संगति । तीच रामाला दूर करती । म्हणून मनासी धरावा सत्संग । रामाविण दुजा नसावा रंग ॥ उदास व्हावे एकाच वेळीं । केव्हा भेटेल वनमाळी ॥ तळमळीचे मुख्य लक्षण । दुसरे विषयाची न व्हावी आठवण ॥ पतिव्रतेला पति जाण । तैसें साधकाला साधन जाण ॥ मोहाला बळी पडणें । याहून नाही दुजें लाजिरवाणें ॥ विघ्न रामसेवेत भारी । तरी आपण सांभाळावें हातीं घेऊन शिरीं ॥ रामाची सेवा हा जाणाव संसार । मग सुखाने करावा व्यवहार ॥ देवास करावा नैवेद्य अर्पण । प्रसाद घ्यावा त्याचा आपण ॥ चित्त ठेवावें रामापाशीं । ध्यास असावा त्याचा अहर्निशीं ॥ गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास । हा ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ॥ देहानें नाहीं करता आले । मन रामापायीं गुंतवले । रामानें त्याचें कल्याण केलें ॥ राम ठेवील त्यांत समाधान । हेंच खरे भक्ताचें लक्षण जाण ॥ भगवंतावांचून मनीं न येऊ द्यावें काही । भगवत्स्वरुप तो सर्व ठिकाणीं पाहीं ॥ आपण व्हावें रामाचें । उदाहरण घालून द्यावें साचें ॥

ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - ऑक्टोबर १ भगवंत - ऑक्टोबर २ भगवंत - ऑक्टोबर ३ भगवंत - ऑक्टोबर ४ भगवंत - ऑक्टोबर ५ भगवंत - ऑक्टोबर ६ भगवंत - ऑक्टोबर ७ भगवंत - ऑक्टोबर ८ भगवंत - ऑक्टोबर ९ भगवंत - ऑक्टोबर १० भगवंत - ऑक्टोबर ११ भगवंत - ऑक्टोबर १२ भगवंत - ऑक्टोबर १३ भगवंत - ऑक्टोबर १४ भगवंत - ऑक्टोबर १५ भगवंत - ऑक्टोबर १६ भगवंत - ऑक्टोबर १७ भगवंत - ऑक्टोबर १८ भगवंत - ऑक्टोबर १९ भगवंत - ऑक्टोबर २० भगवंत - ऑक्टोबर २१ भगवंत - ऑक्टोबर २२ भगवंत - ऑक्टोबर २३ भगवंत - ऑक्टोबर २४ भगवंत - ऑक्टोबर २५ भगवंत - ऑक्टोबर २६ भगवंत - ऑक्टोबर २७ भगवंत - ऑक्टोबर २८ भगवंत - ऑक्टोबर २९ भगवंत - ऑक्टोबर ३० भगवंत - ऑक्टोबर ३१