Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५

१०१

रंगीत काढण्या बैल रस्त्यान झुकतो

माझा बंधुराया लिम्ब उतार फेकीतो.

१०२.

हात मी जोडीत शहर सातारा सडकबाई

बंधुजी गाडीवानाल झोप लई.

१०३

गांडीमाग गाडी,गाड्या नासवाल्यान अडवील्या

सावळ्या राजसान सोन देऊनी सोडवील्या

१०४

गाडीमाग गाडी गाड्या गेल्या नऊ

गुजर बंधुजी , कुठं खंडल्याती गहुं ?

१०५

गाडीच्या गाडीवाना गाडीला खिळामोळा

बैल संभाळ तान्हेबाळा

१०६

गाडीच्या गाडीवाना तुझ्या गाडीला नवा कणा

गाडी हाकार श्यानपना.

१०७.

गाडीमागे गाडी , गाड्या सोडीना नाकेवाला

माग पैक्याचा हुंडीवाला.

१०८.

गाडीच्या बैलाला परोपरीच्या सापत्या

करतो नवल जकात्या

१०९.

गाडीच्या बैलाला रिरसाळीची चंदी

बंधुजींचे रतीबाजोगे नंदी

११०

गाडीच्या बैलाला शैब्यासाखळ्या घाला झुली

बंधुजीनं इद्रायणीची खेप केली.

१११.

गाडीमागं गाडी , मधल्या गाडीला हिरवा रंग

नारी पेठेच्या झाल्या दंग.

११२.

गाडीच्या गाडीवाना गाडीला नवी बाजु

बैल तान्हेले , पानी पाजु

११३.

गाडीच्या बैलाच्या टाप वाजती टपाटपा

बंधुजी करीतो पुन्याच्या खेपा.

११४.

डोंगरकटारीला बैल चरे काळकोस

धनी वारुळावरी बसं

११५.

लक्ष्मीआई आली पुतळा बैलाच्या नखी

ताईत बंधुजी धनी धड्यान सोन जोखी.

११६.

लक्ष्मीआई आली आली चटकचांदणी

जोडव्याच्या नादें बैल बुजले दावणी

११७.

आई तू वाघजई वाघ संभाळ आपुला

पुतळा माझा बंधु बैल चारीतो एकला

११८.

बैल अंजिर्‍याची शिंग सोनियाची

दृष्ट मी काढते बैलासंगट धनियाची

११९

दिस मावळला सांगली मिरजेच्या मैलावर

धनी टाका चाबूक बैलावर

१२०

बंधुजीला रात झाली शिवच्या शेतामंदी

नंदी अवखळ हातामंदी.

१२१

साखळ्याचा नाद ,नाद येतुया घोगरं

बैल बुजला हंबीर.

१२२

बैलामंदी बैल पाखर्‍या राबयेला

गोन्या हलक्या लादयेल्या

१२३.

खांद्यावर पेंडी निघाला बाजाराला

बैलाची जोडी आनिली हजाराला

१२४.

भरल्या बाजारात उंच शिंगाचं बैल

दृष्ट हेड्याला व्हईल

१२५.

भरल्या बाजारात आल्याती तान्ह खोंड

गनीक बंधु माझं दलालामागं हिंड