Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ४०

लाडक्या लेकीचं नाव ठेवीलं अनुसया

संगं परटीन धुणं धूया ।

लेकीच्या पैक्यानं कोन झालया शिरीमंत

कसाबा दिली गाय कशी निघाली हंबरत ।

बहिणभावंडाचा मेळा बसला पाखरांचा

ताईता बंधू माझा पुडा सोडीतो साखरचा ।

दिवस उगवला येऊ दे वाडयाच्या ग आत

बंदू माझ्याला किती सांगू त्याला जोडावं दोन्ही हात ।

दिवस उगवला येऊ दे वाडयाच्या वरयीता

माझ्या त्या बंदूजीला औक मागती पुरईता ।

दिवस उगवला उगवताना पाहीईला

ताईता बंदुजींनी बेल वटीचा वाहीईला ।

माझ्या मनींची हौस मी ग सांगते दम धरा

राम अवतारी डोरलं वर जाळीचा मणी करा ।

आयेव येवढं लेणं डाळी डोरल्यामधी पेटी

लेते कंथाच्या राजवटी ।

डाळीच्या डोरल्यामधी काळी दुल्लड झोकं खाई

भ्रतार म्हणीती ह्या ग डोरल्याचं नाव काई ।

लाल पिंजरीचं कुंकू पैशाला पैसाभार

लेणं कंथाचं आनिवार ।

कंथ हावशा माझ्याच्या डाव्या डोळ्याची तराटणी

मी का अंतरीची शहाणी देते हासत पिया पाणी ।

पिकल्या पानायाचा विडा सुकूनी वाया गेला

माझे तू बहिणाबाई कंथ रुसला पड पाया ।

सासुरवासिनीचं तिचं गरिबावानी जिणं

चुकल्या कामासाठी तिला बोलावं जेनं तेनं ।

सासुरवासिनीची तिची मजला येती माया

तिच्या सिनेची माझी सया ।

थोरल्या घरची सून काय नशीब तुझं थ्वार

वैनी म्हणत्याती दीर ।

कृष्णाबाईच्या पाण्यानं पाय कशानं झालं वलं

दीर बाळीचं माझ्या आलं ।

थोराच्या घरी गडीमाणूस राबत्याती

सासर पाटील धनी राज्याला शोभत्याती ।

गाडीच्या बैलाला चाल पडली मैलाची

दीर माझ्या या राजसाची दृष्ट काढते धन्यासंगं बैलाची ।

बारव हिरीवरी घडी चापितो धोतराची

दीर हावशा माझ्याला दृष्ट झालीया पाखराची ।

मोठं नी मोठं वाटनी जात्याल्या माणसाचं

दीर माझा बाई बार भरतो बंदुकीचं ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४