Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १२

अंगणी माझ्या काढीले मी चैत्रांगण

कलाकुसरीची बाळ तिच्याविना सारं सुन ।

बहिणा सासर्‍याला जाती नको रडूस माळावरी

घाल पदर बाळावरी ।

सासूरवासिनीला तिला आधार कुणायाचा

तिचा ग भ्रतार देव अवतारी गुणायाचा ।

सासूरवासिनीला तिचं वंगाळ लई जिणं

तिला बोलती सारी जणं ।

सहा महिन्याचं सासर तिला वरीस गेलं सज

बया मालन बोलती कशी लागली तुला नीज ।

अंगणी मला दिस क्षणोक्षणी माझी बाळ

सासरी सुखावली माहेर सुनं झालं ।

माहेराला जाती माझं बसणं जोत्याकाठी

पाया पडाया भावजयांची झाली दाटी ।

माहेरी जायायाला जीव माझा रंगयीला

भावज गुजरीला नाही नंदपणा दावीला ।

अंगणी माझ्या आला, आला केळीचा लोंगर

सासर्‍याला गेली बाई सोन केळ्याची खाणार ।

बाळ सासर्‍याला जाती तीका सार्‍यांच्या आवडीची

तिला ग घालवाया सभा उठली चावडीची ।

टिप्पूर चांदणं ते का पूनवी बाईयीचं

सुख माहेरी आईयीचं ।

राणी निघाली माहेरा उभा भ्रतार आंब्यातळी

कधी येशी चंद्रावळी ।

उजळलं माझं घर दीप लावितां समोर

हंबरली गोठीयात गाई आणिक वासरं ।

सासरी जाताना डोळ्याल आल्या गंगा

तिला महिन्याची बोली सांगा ।

सासरी जाताना लेक बघी मागं पुढं

तिच्या आजीची झोप मोड ।

सासरी जाताना लेक डोंगराच्या आड

मला तिथून पत्र धाड ।

सांगून मी ग धाडी मायबाई फार फार

तिनं लहानाची केली थोर ।

सांगून मी ग धाडी आल्या गेल्याला गाठून

झालं वरीस भेटून ।

सांगून मी ग धाडी परदेशीच्या कासाराला

ऊंच बांगडी मखराला ।

आई तवर माहेर बाप तवर माझी सत्ता

नको बोलूस आत्ता भाऊराया ।

आई तवर माहे बाप तवर जाऊ येऊ

मग आणतील माझे भाऊ ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४