Get it on Google Play
Download on the App Store

जोहार

जोहार मायबाप जोहार । सद्गगुरु जनार्दनाचा एक महार । सांगतों ऐका कलियुगाचा विचार । सावधपणें की जी मायबाप ॥ १ ॥

चार युगामाजीं परम । कलियुग हें उत्तम । करावें हरिभजन सत्कर्म । नामस्मरणें असावें की० ॥ २ ॥

नवविधा भक्ति करा । तेणें चुकेल चौर्‍यांयशीचा फेरा । माझे वचनीं विश्वास धरा । नाहीं तरी फसाल की० ॥ ३ ॥

द्वारीं असावें तुळशीवृंदावन । करावें अतिथीचें पूजन । संतांसीं निघावे शरण । हें लक्षण भक्तिचें की० ॥ ४ ॥

तुळशीमाळा घालावी गळां । लावावा गोपिचंदन टिळा । मुखीं नामस्मरण माळा । असावी की० ॥ ५ ॥

व्रत करावें एकादशी । जागर करावा सारेनिशीं । द्वादशी क्षीरापती आवडीसी । आदरें सेवावी की० ॥ ६ ॥

ऐशीं वैष्णवभक्तीचें लक्षणें । सांगितली सर्व खुणें । हें वर्म जो नेणें । अधर्म साधनें करिती की० ॥ ७ ॥

अठरा वर्ण याती । यांची सांगतों मति । सावधान ऐका निश्चिती । रागाऊं नका की० ॥ ८ ॥

आम्ही ब्राह्मण म्हणती । स्नानसंध्या वेदपठण न करिती । अशौच कर्म जारणमारण जपती । मोहनस्तंभनादिक की० ॥ ९ ॥

जगीं म्हणती आम्ही साधिलें । साधन तें दुर राहिलें । परस्त्रीनें चित्त गोविलें कुलुलुलु की० ॥ १० ॥

झालों म्हणती संन्यासी । षड्‌वैरी ह्रदयीं अहर्निशी । परद्रव्य परअन्नासी । रात्रंदिवस लक्षिती की० ॥ ११ ॥

सहांचा करावा नाश । तया म्हणिजे संन्यास । नारायणीं नाहीं आस । कासया नाश कायेचा की० ॥ १२ ॥

पोट भरावया फकीर झाला । अल्ला अल्ला म्हणतां जन्म गेला । नसोनी दोष अंगीं लाविला । हायदोष हायदोष म्हणती की० ॥ १३ ॥

झालों म्हणती आम्ही जोगी । राख लाविती वाउगी अंगीं । भोगी ना त्यागी ना योगी । वर्म नेणती जोगाचें की० ॥ १४ ॥

जोग साधावा उत्तम । न करावें संसारिक कर्म । साधावें उत्तमोत्तम । वाउगा श्रम करू नयें की० ॥ १५ ॥

आम्हीं जंगम जालों म्हणती । शिव उपासना न करिती । पोटासाठीं भिक्षा मागती । शंख वाजविती भं भं भं भं की० ॥ १६ ॥

जालों म्हणती मानभाव । अंतरी शुद्ध नाहीं भाव । वर मुंडिती मस्तक वाव । गुरुशिष्य भाव दाविती की० ॥ १७ ॥

गुरुशिष्य म्हणती । झोळीस झोळी लाविती । गडबडगुंडा झाला म्हणती । कृष्ण कृष्ण म्हणती की० ॥ १८ ॥

नसोनी काळेपणा लाविती अंगीं । उगेच सोंग मिरविती जगीं । देवाचा द्वेष करिती वाउगी । ही फजिती बरी की० ॥ १९ ॥

आम्ही संत जालों म्हणती । गळां माळां गोपीचंदन लाविती । दिवटी घेउनी हातीं । उदो उदो करिती की० ॥ २० ॥

पोट भरावया कीर्तन करिती । लोकां अर्थ सर्व दाविती । भाळे भोळे भोंदिती । आपण वर्म नेणती । कीर्तनचें की० ॥ २१ ॥

परद्रव्य परनारीसी । स्पर्श न करावा निश्चयेंसी । ऐशी मर्यादा सांगती लोकांसी । आपण तेंचि कर्म करिती की० ॥ २२ ॥

एकविध भक्ति करावी म्हणती । ना ऐकावीं आणिकांची स्तुति । काई व्यथा जालिया शरीराप्रति । मग देवऋषि पहाती की० ॥ २३ ॥

आणिती निंब नारळ ऊद सामान । मेंढरें कोंबडे मारिती जाण । वेताळ महिषासूर पूजन । नग्न होऊन करिती की० ॥ २४ ॥

म्हणती खंडेराव दैवत आमुचें । तें कोपलें वो साचें । कुळधर्म सांडिले वडिलांचे । म्हणोनि दुःख पावलो की० ॥ २५ ॥

मग गोपीचंद टाकिती । आदरें भंडार लाविती । भरित रोडगे करिती । येळकोट येळकोट म्हणती की० ॥ २६ ॥

ऐकोनी कीर्तन श्रवण । गीता ज्ञानेश्वरी मनन । अश्विन मास आलिया जाण । शक्तीपूजन करिती की० ॥ २७ ॥

ऐशियासी एकनिष्ठ भाव । तयासी कायसें वैभव । उगेच सोंगाचें गौरव । वाढविती की० ॥ २८ ॥

एकविधा भक्ति करावी । वाट आणिकांची न पहावी । शुभाशुभ येती बरवीं । ते प्रारब्धदशे प्रमाण की० ॥ २९ ॥

जैसें पतिव्रतेचें मन । सर्व पतीच प्रमाण । अपाय उपाय हे तों जाण । ईश्वरप्रमाण की० ॥ ३० ॥

एका शरण जनार्दन । मी बोलिलों सत्यवचन । अनुभउनी खूण । या पंथें जाऊं नका कीं जी मायबाप ॥ ३१ ॥

भारुडे

स्तोत्रे
Chapters
आंधळा चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार... अंबा अयोध्येचा हो देव्हारा माझे कुळीची कुळस्वामिनी बहिरा जालो या या जगी संसार नगरी बाजार भरला भाई अलक्ष लक्ष मी भिकारी आम्ही परात्पर भिकारी चौदेहांची घेऊनी दीक्षा चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा अलक्ष लक्ष पाहवेना आम्ही परात्पर देशी नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी भूत जबर मोठे गं बाई आंधळा पांगळा आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु आंधळा पांगळा दाते बहु असती परि भवानी मी तुझा भुत्या खरा ... पंधरा सतरांचा सतरांचा हा ... चोपदार आला चोपदार आला ॥धृ... मोडकेसे घर तुटकेसे छप्पर ... सुंदरे, चिद्‌‍घने, माझे र... एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥ ... सफेद कलंदर फकीर ।बाबा सफे... फकीर फकीर फकीर गाय अगा ते परम शुभ ऐक । लाभ द... आरता येरे धाकुट्या मुला ।... संचित बरवें लिहिलें । भाग... जोहार मायबाप जोहार । सकळ ... जोहार मायबाप जोहार । मी स... अयोध्येचा हो देव्हारा । आ... चल चल चल । निरंजन जंगलका ... पलखम्यानें चार जुग ज्यावे... संसार बाजेगिरी देख । दुरल... चल चल चल । याद करो गुरु ग... सुनो संत सज्जन भाई । हम त... प्राप्ती एक भजन विरुद्ध ।... सगरमें बाजी पतालमें बाजी ... संचित बरवें लिहिलें । भाग... लगे ढोल लगे ढोल । जरी तुझ... श्रीकृष्ण माया जी पाहे । ... गौळण गौळण गौळण होळी जागल्या जागर जंगम जोगवा जोहार जोशी जोशी जोशी अष्टपदी भटीण भटीण बैल छापा डोहो गाय गोपाळ हळदुली कहाणी कंजारीण कोल्हाटीण कुंटीण कुत्रें लग्न मुलगी नीति पांखरू पिंगळा महाद्वारीं बोली बो... पिंगळा पिंगळा पिंगळा पोपट रहाट सर्प सासुरवास सासुरवास शंखीण डंखीण शंखीण डंखीण शिमगा सौरी सौरी सौरी सौरी सौरी सौरी सौरी स्वप्न थट्टा टिटवी विंचू व्यापार आडबंग बाहुलें भूत भूत धांवा धांवा द्रौपदीचा धांवा किल्ला कोडें कोडें कोडें नवल नवल नवल नवल नवल नवल नवल पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाईक पाळणा पाळणा पाळणा पाळणा अभयपत्र अर्ज अर्जदस्त विनंतीपत्र थाक टिळा अभयपत्र अर्जाचा जाब जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार मायबाप जोहार । याच ... जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार जोहार ताकीदपत्र पत्र कौलपत्र कौल जमाखर्च जाबचिठ्ठी नानक नानक जोगी चिरंजीवपद बुलबुल भांड भांड भांड भांड फुलवरा फकीर फकीर फकीर मेसाबाई हुशारी हापसी गारुडी गारुडी गारुडी गारुडी गारुडी गारुड गावगुंड गावगुंड दरवेश यलमा सटवाई मरीआई महालक्ष्मी महालक्ष्मी गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ गोंधळ अंबा महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण महारीण जागल्या जागल्या डौर अक्कल बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी बेटकुळी फुगडी फुगडी वैदीण वैदू कानोबा खेळिया कोडे कोल्हाटी कोल्हाटीण मल्हारी माळी मानभाव मानभाव मांग मुका नकटी नानक नवलाई पिसा पिसा पोर संसार संन्यास सर्प सौरी सौरी वाघ्या वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव वटवाघूळ वेणु