Get it on Google Play
Download on the App Store

चतृर्थ मंत्र:

यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् | सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ||१६||
पद्मानने पद्मऊरू पद्माक्षी पद्मसम्भवे | तन्मेभजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् ||१७||
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने | धनं मे लभतां देवि सर्वकामांश्च देहि मे ||१८||
पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि | विश्वप्रिये विष्णु्मनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ||१९||
पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथम् | प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे ||२०||
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः | धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु ते ||२१||
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा | सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ||२३||
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः | भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ||२४||
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे | भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ||२५||
विष्णुपत्नीं क्षमादेवीं माधवीं माधवप्रियाम् | लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ||२६||
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि | तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ||२७||
श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते | धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ||२८||

लक्ष्मीच्या प्राप्तीची इच्छा धरणाऱ्या मनुष्याने स्नान करून स्वच्छ आणि पवित्र बनून प्रयत्न करावा आणि सतत या पंधरा मंत्रांचा जप करावा. हे कमलमुखी, कमलऊरू, कमलाक्षी, पद्मजे; तू माझ्या सेवेचा स्वीकार कर म्हणजे मला सुख प्राप्ती होईल. अश्व, गायी आणि धन देणाऱ्या हे धनदात्री देवी, तू मला धन दे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. हे पद्ममुखी, पद्मप्रिये, कमलपत्राक्षी, विश्वप्रिये, विष्णूभगवानाच्या मनोनुकूल वागणाऱ्या देवी, माझ्या ह्दयात तुझे चरणकमल ठेव. तू प्रजेची माता आहेस. पुत्र, पौत्र, धन, धान्य, हत्ती, अश्व, गाय, रथ आणि आयुष्य दे. अग्नि, वायू, सूर्य, वसू, इन्द्र, बृहस्पती, वरूण वगैरे माझे धन व्हावेत. हे वैनतेय, तू सोमपान कर. इन्द्रानेही सोमपान करावे आणि त्यांनी मला सोमरस द्यावा. ज्यांनी पुण्यकर्म केले आहे असे भक्त क्रोध, मत्सर, लोभ किंवा अशुद्ध बुद्धी निर्माण न व्हावी यासाठी श्रीसूक्ताचा जप करोत. कमळ जिचे घर आहे, कमळ जिच्या हातात आहे, धवलवस्त्र जिने धारण केले आहे, चंदनाच्या माळांनी जी शोभत आहे, जी विष्णूपत्नी आहे, मनोहर आणि कल्याण करणारी देवी आहे ती माझ्यावर प्रसन्न व्हावी. विष्णूपत्नी, क्षमाशील, माधवप्रिया, माधवाची पत्नी, अच्युतपत्नी, सर्वजनप्रिया देवीला माझा नमस्कार. आम्ही महालक्ष्मीला जाणून घेतो, तिचे ध्यान करतो. विष्णूची पत्नी लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो. श्री, तेज, निरोगिता, आयुष्य. धन-धान्य,पशू, बहूपुत्र आणि शंभर वर्षाचे आयुष्य तू आम्हाला दे.