Get it on Google Play
Download on the App Store

चौकी बांधणे

हे काम नेहमी बंजारे, आदिवासी, लमाणी आणि भटके लोक करतात. ते आपली जनावर किंवा लहान मुले यांच्या संरक्षणासाठी चौकी बांधतात. त्यामध्ये हे लोक आपल्या तान्ह्याला एखाद्या झाडाच्या सावलीत झोपवतात आणि त्याच्या भोवती छडीने गोल रेषा आखतात. मग काही मंत्र बोलून चौकी बांधतात. त्यांच्या या प्रयोगामुळे त्या वर्तुळात विंचू, साप, जनावर किंवा वाईट विचार मनात आलेली व्यक्ती प्रवेश करू शकत नाही. हाच प्रयोग लक्ष्मणाने वनात सीता मातेच्या रक्षणासाठी केला होता ज्याला आज लक्ष्मणरेषा म्हटले जाते. हा चौकी बांधण्याचा प्रयोग कित्येक राजे महाराजे आपल्या खजिन्याच्या रक्षणासाठी देखील करत आले आहेत. त्यांचा खजिना म्हणूनच आजही सुरक्षित आहे. रावणाने आपल्या संपूर्ण महालाची चौकी बांधली होती.
असे मानले जाते की बंजारे, आदिवासी, पिंडारी समाज आपले धन जमिनीत पुरून झाल्यावर त्या जमिनीच्या आसपास मंत्र-तंत्राद्वारे 'नागाची चौकी' किंवा 'भुताची चौकी' बसवत ज्यामुळे इतर कोणीही ते धन खोदून काढून प्राप्त करू शकत नसे. जर कोणाला त्या पुरून ठेवलेल्या खजिन्याचा सुगावा लागला आणि त्याने तिथे चोरी करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचा सामना रक्षक नाग किंवा भूताशी होत असे.