Get it on Google Play
Download on the App Store

मेक्सिकन माफिया


लॉस एंजेलिस हे शहर तसे पहिले तर जगभरात मनोरंजनाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु गुन्हेगारी जगतात या शहराला टोळ्यांची भूमी म्हणून ओळखले जाते. या शहरात ४५००० पेक्षा जास्त अपराधी आहेत जे कोणत्या ना कोणत्या टोळीचे सभासात आहेत. परंतु या सर्वांमध्ये सर्वाधिक खतरनाक आहेत ते मेक्सिकन माफिया. ही संघटना अमेरिकेच्या तुरुंगांमधून ऑपरेट होते. या संघटनेत कित्येक हजार सदस्य आहेत. ते अमेरिकेच्या वेगवेगळ्या तुरुंगांत विखुरलेले आहेत. माफिया जगतात या अपराध्यांची दहशत अशी आहे की अपराधी देखील यांना हप्ते देतात. त्याच्या बदल्यात ही संघटना त्या अपराध्यांच्या सुरक्षिततेची हमी घेते. मोठ्यात मोठा गुन्हेगार देखील या संघटनेला हप्ता देण्याचे नाकारण्याची हिम्मत करू शकत नाही. या संघटनेचे गुन्हेगार लूटमार, दरोडे, अपहरण, खंडणी आणि खून यांसारखे सर्व अपराध करतात. परंतु प्रोटेक्शन च्या नावाखाली अपराधी आणि दलाल यांच्याकडून खंडणी वासून करणे या संघटनेचा खरा धंदा आहे. जो कोणी यांना खंडणी देण्यास नकार देईल, समजून जावे की त्याच्या आयुष्याची दोरी तुटत आलेली आहे, आणि कोणत्याही क्षणी मृत्यू त्याच्यावर झडप घालू शकतो. संघटनेचे हे असे अपराधी आहेत ज्यांना गुन्हेगार देखील चळचळा कापतात. परंतु असे नाही की मेक्सिकन माफिया सर्वांत खतरनाक आहे. त्यांच्यापेक्षा देखील खतरनाक आहे एक अशी संघटना जिने जपान मध्ये आपली दहशत पसरवलेली आहे.