Get it on Google Play
Download on the App Store

थायलंड चे राष्ट्रीय चिन्ह गरुड


गरुड एक मोठ्या आकाराचा पक्षी आहे, जो जवळपास लुप्त झाल्यात जमा आहे. इंग्रजीमध्ये त्याला ब्राम्हणी पक्षी (The Brahminy Kite) म्हटले जाते. त्याचे वैज्ञानिक नाव “Haliastur indus ” आहे. फ्रेंच पक्षी विशेषज्ञ मथुरिन जैक्स ब्रिसन ने सन १७६० मध्ये पहिल्यांदा हा पक्षी पाहिला होता, आणि त्याचे नाव "Falco Indus" ठेवले होते, त्याने दक्षिण भारताच्या पोन्डिचेरी शहराच्या डोंगराळ भागात हा पक्षी पाहिला होता. यावरून सिद्ध होते की गरुड काल्पनिक पक्षी नाहीये. म्हणूनच भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये गरुडाला विष्णूचे वाहन मानले गेले आहे. आणि राम विष्णूचा अवतार आहे, आणि थायलंडचे राजा रामाचे अवतार आहेत, आणि बौद्ध असूनही ते हिंदू धर्मावर अपार श्रद्धा ठेवतात, म्हणून त्यांनी "गरुड" राष्ट्रीय चिन्ह घोषित केले आहे. एवढेच नव्हे, तर थाई संसदेच्या समोर गरुड बनलेला आहे.