Get it on Google Play
Download on the App Store

कुंभ


गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
राशी स्वरूप - घडा, राशी स्वामी - शनी.
१. राशीचक्रातील अकरावी रास. राशीच्चे चिन्ह आहे घडा घेऊन उभा असलेला मनुष्य. राशीचा स्वामी आहे शनी. शनी हा मंद ग्रह आहे आणि याचा रंग निळा आहे. म्हणूनच या राशीचे लोक गंभीरपणा आवडणारे असतात आणि गंभीरपणेच कार्य करतात.
२. हे लोक बुद्धिमान होण्याच्या बरोबर व्यवहार कुशल सुद्धा असतात. जीवनात स्वातंत्र्याच्या पक्षाचे असतात. निसर्गावर प्रचंड प्रेम करतात.
३. कोणाशीही पटकन मैत्री प्रस्थापित करतात. सामाजिक उलाढालीमध्ये रुची ठेवणारे असतात. त्यात देखील साहित्य, कला, संगीत आणि ज्ञान यांना अधिक आवडते.
४. या लोकांचे साहित्य प्रेम हे उच्च कोटीचे असते.
५. केवळ बुद्धिमान लोकांशी बोलायला आवडते. आपल्या मित्रांशी कधीही भेदभावाचा व्यवहार करत नाहीत.
६. यांचा व्यवहार सर्वांना त्यांच्याकडे आकर्षित करतो.
७. या राशीचे मुलगे बारीक असतात. त्यांचा व्यवहार स्नेहपूर्ण असतो. यांचे हास्य यांना आकर्षक व्यक्तिमत्व प्रदान करते.
८. यांची आवड उच्च स्तरीय खाणे-पिणे आणि वेशभूषेत असते. बोलण्यापेक्षा ऐकणे जास्त पसंत करतात. लोकांना भेटणे, त्यांच्यात मिसळणे यांना आवडते.
९. हे आपल्या व्यवहारात अतिशय इमानदार असतात म्हणूनच मुली यांच्या प्रशंसक असतात. कलात्मक अभिरुची आणि सौम्य व्यक्तिमत्व असलेल्या मुली यांना आवडतात.
१०. आपल्या इच्छा दुसऱ्यांवर लाडाने यांना आवडत नाही आणि आपल्या घरावर, परिवारावर यांचा फार स्नेह असतो.
११. कुंभ राशीच्या मुली तपकिरी केसांच्या आणि मोठ्या डोळ्यांच्याअसतात. त्या कमी बोलतात, त्यांचे हास्य आकर्षक असते.
१२. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते परंतु सहजपणे कोणालाही त्या जवळचे मानत नाहीत. या फार सुंदर आणि आकर्षक असतात.
१३. या एखाद्या कलात्मक छंदात, चित्रकला, काव्य, संगीत, नृत्य किंवा लेखन इत्यादींमध्ये वेळ व्यतीत करतात.
१४. सामान्यतः कमी बोलणाऱ्या आणि गंभीर व्यक्तींकडे या आकर्षित होतात.
१५. यांचे जीवन सुखाने व्यतीत होते, कारण यांच्या इच्छा आकांक्षा फार नसतात. आपल्या घराला देखील कलात्मक रूपाने सजवतात.