Get it on Google Play
Download on the App Store

'नाही' म्हणायला शिका

मन "नाही" म्हणत असेल, तर "हो" म्हणू नका. विश्वातील टॉप यूनिवर्सिटी (University of California in San Francisco) मधे झालेल्या संशोधनावरून असे लक्षात आले आहे की ज्या लोकांना नकार देताना फार कठीण जाते त्यांना तणाव, निष्क्रियता आणि डिप्रेशन यांचा सामना करावा लागतो, आणि या सर्व गोष्टी कारकीर्द वाढव्ण्यात्त खूप मोठी बाधा आहेत. "नाही" म्हणणे अनेक लोकांसाठी मोठे आव्हान असते. "नाही" हा अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली शब्द आहे आणि तुम्ही त्याचा उपयोग करताना मागेपुढे पाहण्याची आवश्यकता नाही. जेव्हा "नाही" म्हणण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही गुळमुळीत गोष्टी उदा. "मला नाही वाटत की मी..." किंवा "मी या बाबतीत शुअर नाहीये..." अशा गोष्टी बोलू नका. "नाही" सांगण्याची हिम्मत केल्यास तुम्हाला हातातील कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी मदत होते आणि ही गोष्ट तुम्हाला यशाच्या जवळ जाण्यासाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देते.