Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

 तुम्ही असे आयुष्य जगात आहात जे तुम्ही स्वतः बनवले आहे! तुम्ही परिस्थितीची शिकार नाहीयात. कोणीही तुमच्यावर तुमच्या व्हेल्यूज आणि महत्त्वाकांक्षांच्या विरोधात जाऊन निर्णय घेण्याला आणि त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची जबरदस्ती करू शकत नाही. आज तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ती तुम्ही स्वतःच निर्माण केलेली आहे. अशाच प्रकारे तुमचे भविष्य देखील सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून असते. जर तुम्ही स्वतःच स्वतःला कशात अडकलेले पाहिले तर बहुतेक करून ते अशामुळे असते की तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी आणि आपली स्वप्न पुरी करण्यासाठी आवश्यक ती रिस्क घेऊ शकत नाहीयात.

जेव्हा पाउल उचलण्याची वेळ जवळ येईल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही त्या शिडीच्या खालच्या पायरीवर असले पाहिजे जी तुम्हाला चढायची आहे, त्या शिडीच्या वरच्या पायरीवर नाही ज्यावरून तुम्हाला खाली उडी घ्यायची आहे.