Get it on Google Play
Download on the App Store

आत्मविश्वास

सर्वांत पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे आत्मविश्वास! यशस्वी लोकांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. सरळ आहे की त्यांचा स्वतःवर आणि तेव जे काही करतात त्यावर ठाम विश्वास असतो. हा आत्मविश्वास त्यांच्यात यशस्वी झाल्यानंतर आलेला नसतो. तो त्यांच्याकडे आधीपासूनच असतो.

या बाबतीत विचार करा :

क. संशयातून संशय जन्माला येतो. दुसरे लोक तुमच्या विचारांवर, तुमच्या क्षमतेवर विश्वास का ठेवतील, जर तुमचाच तुमच्या स्वतःवर विश्वास नसेल?

ख. नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आत्मविश्वास हवा. घाबरट किंवा स्वतःला असुरक्षित समजणारे लोक आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहणारे असतात. त्यांना ती सवयच असते. या झोन मधून सुटका आपल्या आपण होत नसते. हेच कारण आहे की ज्या लोकांत आत्मविश्वास नसतो ते बंद गल्लीसारख्या नोकऱ्यांत अडकून पडतात आणि सर्व महत्वपूर्ण संधी जवळून जाऊ देतात.

ग. आत्मविश्वास नसलेली व्यक्ती बाहेरच्या परिस्थितीचे गुलाम बनून राहतात. यशस्वी लोकं आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींनी विचलित होत नाहीत, हेच कारण आहे की ते प्रत्येक मुक्कामावर पुढेच जात राहतात.

आत्मविश्वास हा यशस्वी कारकीर्दीचा सर्वांत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, आणि आत्मविश्वास बळावल्याने तुम्ही अशी उंची गाठू शकाल ज्याय्च्या बाबतीत तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल. कोणी दुसरे नाही तर तुम्ही स्वतःचा आहात जे आपल्या महत्त्वाकांक्षांपासून स्वतःला दूर ठेवत आहात. हीच वेळ आहे, तुम्ही स्वतःवर संशय घेणे बंद करा.