Get it on Google Play
Download on the App Store

कबर आहे की महाल?

महाल हा शब्द हिंदूंच्या काळापासून चालत आलेला आहे. मुसलमानांनी कधीही या शब्दाचा प्रयोग केलेला नाही. मग ताज बरोबर महाल हा शब्द जोडून निर्णय कसा घेतला गेला? याच्या व्यतिरिक्त त्या काळच्या कोणत्याही सरकारी कागदात असा कोणताही उल्लेख नाही की ताजमहाल नावाची कोणतीही निर्मिती केली गेली. काही लोक म्हणतात की या महालाचे नाव मुमताजच्या नावापासून प्रेरित आहे तर त्यांनी हे ऐकावे की तिचे खरे नाव मुमता-उल-जमानी होते. व्हीन्सेंट स्मिथने आपले पुस्तक अकबर दि ग्रेट मुघल मध्ये लिहिले आहे की बाबरचा ज्या स्थानावर मृत्यू झाला ते भवन फार विशाल आणि सुंदर होते. त्याच भवनाला बदलून ताजमहालात परिवर्तीत करण्यात आले.