Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

ओ पी नैय्यर


ओ पी नैय्यर यांचा जन्म १९२६ मध्ये झाला होता आणि त्यांनी भारतीय चित्रपट जगतातील अनेक यशस्वी चित्रपटांना संगीत दिले ज्यापैकी एक चित्रपट 'नया दौर' हा आजही लोकांच्या मनात ताजा आहे. त्यांनी त्या काळातील सर्व प्रमुख गायक आणि गायिका यांच्या समवेत काम केले परंतु त्यांच्यात लता मंगेशकर समाविष्ट नव्हती. त्यांच्या संगीताचे एक खुसखुशीत वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक चित्रपटात एक गाणे एखाद्या विनोदी अभिनेत्यावर निश्चित चित्रित करत असत, मग तो मेहमूद असो किंवा जॉनी वॉकर!