Get it on Google Play
Download on the App Store

समलिंगी : उत्क्रांतीतील एक कोडे.

उत्क्रांतीच्या सिद्धान्तांत सर्व जीवमात्रांचा एकमेव उद्देश असतो तो म्हणजे जिवंत राहणे नि मुलाना जनमाला घालणे. पण ह्या दोन्ही गोष्टीत थोडा तरी विरोधाभास असतो. एखादा प्राणी जिवंत राहिला तर त्याला जिवंत राहण्यासाठी अन्न आणि पाणी इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. हीच प्रजाती जर वेगाने प्रजनन करू लागली आणि जिवंत सुद्धा राहू लागली तर लोकसंख्या विस्फोट होऊ शकतो आणि शेवटी ऍन पाण्याच्या कमतरतेतेने हे प्राणी हजारोंच्या संख्येने मारू शकतात. हरणे, नीलगायी, हत्ती इत्यादी अनेक प्राणी ह्या प्रकारे लाखोंच्या संख्येने मेले आहेत.

पण त्याच वेळी प्राणी जर प्रजनन करण्यात विशेष समर्थ नसतील तर एक छोटासा भूकंप, पूर इत्यादी घटनेने त्यांची लोकसंख्या जर घटली तर पुन्हा लोकांसंख्या वाढणे अशक्य ठरू शकते. पांडा हा प्राणी ह्याच कारणा साठी जवळ जवळ नामशेष झाला आहे. पांडा हा प्राणी प्रजनन करण्यास अत्यंत नाखूष असतो डॉक्टर मंडळींनी पांडा साठी पांडा पॉर्न सुद्धा बनवले आहे जेणे करून त्यांना शरीर संबंध बनवण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते.

मनुष्यजातीला सुद्धा हजारो वर्षां पूर्वी अश्याच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले असावे. समलिंगी प्रवृत्ती हि मानवी आणि इतर अनेक प्रजातीत दिसून येते. विज्ञानाच्या मते मानवाने प्रजनन करावे पण त्याच वेळी ते जास्त वेगाने सुद्धा करू नये म्हणून समलिंगी लोक उत्क्रांतीच्या दरम्यान उत्क्रांत होत राहिले.

असे दिसून येते कि एखाद्या कुटुबांत खूप स्त्रिया जन्माला आल्या कि नंतरची पुरुष मुले गे होण्याची शक्यता वाढते. खूप स्त्रिया असल्या म्हणजे खूप मुले जन्माला येऊ शकतात त्यामुळे पुरुषांची संख्या मर्यादित करण्याचा प्रयत्न निसर्ग करतो. उलटपक्षी खूप पुरुश मुले जन्माला आली कि त्यानंतरची स्त्री अपत्ये लेस्बियन होऊ शकतात.