Get it on Google Play
Download on the App Store

नामपट्ट्यांचे वास्तू-छत

घराच्या भिंती उपदिशांना असल्यास वास्तू-छत करण्याची पद्धत
घराच्या भिंती पूर्व, पश्‍चिम आदी मुख्य दिशांना समांतर नसून आग्नेय, नैऋत्यादी उपदिशांना समांतर असल्यास दोन भिंतींच्या मध्यभागी दोरी लावून नामपट्ट्यांद्वारे वास्तू-छत तयार करावे.

घराच्या भिंती उपदिशांना असल्यास वास्तू-छत लावण्याची पद्धत
काही वेळा घराच्या भिंती पूर्व, पश्चिम आदी मुख्य दिशांना समांतर नसतात, तर त्या आग्नेय, नैऋत्यादी उपदिशांना समांतर असतात. अशा वेळी दोन भिंतींच्या मध्यभागी दोरी बांधून दोरीला बाजूच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे नामपट्ट्या लावाव्यात आणि त्याद्वारे वास्तू-छत बनवावे. यामुळे वास्तूभोवती संरक्षक कवच निर्माण होते.

वास्तूशुद्धी-संचाची सात्त्विकता ‘लोलक चिकित्सा-पद्धती’द्वारे सिद्ध
‘आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेल्या ‘लोलक चिकित्सा-पद्धती’द्वारे विविध वस्तू, वातावरण, व्यक्‍ती इत्यादींमधील सकारात्मक अथवा नकारात्मक शक्‍तीचे अस्तित्व ओळखता येते. सकारात्मक शक्‍ती असल्यास लोलक घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरतो, तर नकारात्मक शक्‍ती असल्यास तो घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो.

वास्तूशुद्धी-संचाच्या संदर्भात एका साधकाने लोलकाचा पुढीलप्रमाणे प्रयोग केला
मी वास्तूच्या दोन प्रतिकृती तयार केल्या. एका प्रतिकृतीमध्ये वास्तूशुद्धीसंचातील नामपट्ट्या लावल्या. दुसर्‍या प्रतिकृतीमध्ये काहीच केले नाही. यानंतर आळीपाळीने दोन्ही वास्तूंवर लोलक धरला. नामपट्ट्या लावलेल्या वास्तूवर धरलेला लोलक सकारात्मक स्पंदने दाखवत होता, तर नामपट्ट्या न लावलेल्या वास्तूत तो नकारात्मक स्पंदने दाखवत होता. यावरून नामपट्ट्यांची सात्त्विकता सिद्ध होते.’