Get it on Google Play
Download on the App Store

अंतिम भाग

क आता आईच्या शरीरा पुढे होता. अनंतमती चे शरीर मृत असून सुद्धा चैतन्यमयी होते. शुक पद्मासनात बसला. तो घरी परत आलाय ह्याची पूर्वसूचना सुलतान खान ला मिळाली असेल हे त्याला ठाऊक होते. मागील ३ वर्षांत सुलतान खान ने काय वेष धारण केला असेल सांगणे मुश्किल होते. आता फक्त इथे राहून त्याची वाट पाहायची होती. असुरी शक्तींना त्याच्या आगमनाची चाहूल लागली होती. आंत शिरताना त्याने घारापुढील पारिजातकाच्या वृक्षावरील घुबड पहिले होते. घुबडे, कावळे, सर्प सारख्या प्राण्यांना असुर आपल्या ताब्यांत करू शकतात. त्यांच्या डोळ्यांतून ते पाहू शकतात, संकटे ओळखू शकतात. शुकाच्या अंगांत यक्षिणीचे तेज होते ते ह्या हेरांनी नक्कीच ओळखले असेल.

अनेक तास निघून गेले आणि शुकाला घराच्या बाहेर गजबजाट ऐकू आला. सुलतान खानच नाही तरी आणखीन हि लोक आले होते. शुकाने उठून त्या खोलीच्या बाहेर प्रवेश केला. ह्यावेळी सुलतान खानाचे खरे रूप त्याला सहज दिसत होते. साधनेने त्याच्या मनाचे चक्षु उघडले होते. सुलतान खान आता अण्णा झाला होता. महाराष्ट्रातील एक संतपुरुष म्हणून त्याची ओळख होती. त्याचा बरोबर सहा १४-१५ वर्षांचे मुलगे होते. ते असुर नव्हते तरी सुद्धा काही तरी भयानक शक्ती त्यांच्यांत होती.

अण्णा चालत आंत आले. साधा सफेद सादर, सफेद पेंट आणि कोल्हापुरी पादत्राणे. शुक दिवाणखान्यात शांत पाणे उभा होता. खिडकीच्यावर लावलेले झुंबर वाऱ्याने हलकेच हालत होते पण अण्णा आंत येतंच जणू काही हवा सुद्धा स्तब्ध झाली. शुकाचे बालपण सुलतान खानच्या भयांत गेले होते. आज ती व्यक्ती नव्या रूपांत समोर होती.

"ती बया चांगलाच खेळ करून गेली. तिच्या अंगांत इतका दम असेल वाटले नव्हते. पण तुझ्या सारखा नालायक माणूस तिने निवडला?  का आलास तू परत? तुला काय वाटले तुझ्या खोट्या आईने काही शक्ती दिली म्हणून तू माझा सामना करू शकतोस ? उलट आता यक्षिणीचा आत्मा मी काबीज करेन. तुझ्या अंगात आहे ना ती ? " अण्णा कुत्सित पणे बोलत होता. त्याचे सहाही साथीदार त्यांच्या भोवताली वर्तुळांत उभे होते. अण्णाने कितीही कठोर शब्द वापरले तरी तो अजून आपल्यावर हल्ला करत नाही हे शुकाच्या लक्षांत आले. आपला जीव घेऊन यक्षिणीचे तेज आपल्या शरीरांत वास करून आहे ते त्याला हवे आहे पण आपल्याविषयी अण्णाच्या मनांत भीती सुद्धा आहे. तसे पाहता अनंतमतीने शुकाला विशेष काहीही शक्ती डोई नव्हती. गुरु रक्तसंभवानी सुद्धा शुकाला प्रकटीकरण सोडून काहीही विद्या दिली नव्हती. प्रकटीकरण विद्या घातक असली तरी इथे नक्की कश्या प्रकारे वापरावी ह्याचे काहीही ज्ञान शुकाला नव्हते. आईने विद्या आणायला सांगितली होती पण आता करायचे काय ? त्याच्या हृदयाचा वेग वाढला होता.

त्या सहाही मुलांनी आपलय खिशांतून लहान चाकू काढले. हातावर त्यांनी विशिष्ट प्रकारांत घाव घालून त्याचे शिक्के खाली जमिनीवर निर्माण केले. आता फक्त शुक आणि अण्णा एका काळ्या वलयांत लिप्त झाले. रक्तसंभवनी ज्या प्रकारे शुकाला एका वेगळ्या दुनियेत नेले होते त्याच प्रमाणे आता ते वेगळ्या दुनियेत पोचले. हवेंत धुके, जमीन शुष्क आणि काळी होती. प्रकाश कमी होता. अण्णा उर्फ सुलतान उर्फ फ्रॅंक आता आपल्या खर्या रूपांत होता. ८ फूट लांब मनुष्याची आकृती पण कृष्णवर्णीय रंग आणि लाल रंगाचे केस ह्यांत तो असुर भयानक वाटत होता. त्याला २ ऐवजी ४ हाथ होते. अंगावर प्रचंड केस होते.

असुराने तोंडातून काहीतरी आवाज काढण्यास सुरवात केली. शुकाला शब्द ऐकू येत होते पण अर्थ समजत नव्हता. कदाचित कुठली तरी पुरातन भाषा होती. शुकाने सुद्धा ध्यान लावेल त्यांने आपला संकोच बंध मुक्त केला. असुरांचे डोळे विस्फारले. "वराह तंत्र?" "तुला कुणी शिकवले ? अनंतमतीच्या हृदयांत इतके मोठे रहस्य ? पण काही फरक पडत नाही तिचा आणि तूच मृत्यू अटळ आहे." असुराने शुकाला पुन्हा धमकी दिली.

शुकाने पुन्हा मन एकाग्र करून आपले दोन्ही बंध तोडले. त्याचे मन भयमुक्त झाले होते नई तो असुराला आणखीन स्पष्ट पणे पाहत होता. असुराच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. "काही फायदा नाही मूर्खां. मी आधीच तुझ्या शरीराचा ताबा घेतला आहे" असुराने शुकाला म्हटले. शुकाने आपले शरीर हलविण्याचा प्रयत्न केला. त्याला छायाविद्या येत होती ज्यांत कुठल्याही सावलीचा उपयोग करून दुसर्या माणसाच्या शरीराचा ताबा घेतला जातो.

शुकाचे दोन्ही हात जवळ होते त्यामुळे त्याला प्रकटीकरण विद्या वापराने शक्य होते. असुर हळू हूल पावले टाकत त्याच्या जवळ आला. आधी साधे वाटणारे असुरी शरीर आता सावली प्रमाणे दिसत होते. असुराचा तो सावली प्रमाणे वाटणारा हात शुकाच्या पोटांत घुसला. ह्यावेळी त्याला वेदना झाल्या नाहीत पण हतबलपणा त्याला सहन नाही झाला. असुरी हाताने शुकाच्या पोटांत काही तरी तोडले. शुकच्या शरीरांतून एक प्रकारचे तेज बाहेर येऊ लागले. सुकाळ आता हे सहन नाही झाले त्याने ज्ञानपूर्वक रुद्राची आठवण केली. धरणी कॅम्प पावू लागली. असुर सुद्धा थोड्या आश्चर्याने आजू बाजूला पाहू लागला. काही तरी वेगळे होतेय हे त्याला लक्षांत आले म्हणून शुकाच्या शरीरातून यक्षिणीचे तेज बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याने जास्त वेगाने सुरु केला. शुकाच्या मागे आता पहाडाप्रमाणे रुद्र उभा होता. सावली प्रमाणे तोंडांत एक आडवे शास्त्र घेऊन तो अक्राळ विक्राळ रुद्र उपस्तिथ होतंच असुर सुद्धा एक पाऊल मागे गेला. पण एन्व्हाना अनंतमतीचा आत्मा सुद्धा बाहेर आला होता. शुकाच्या बाजूला एका ज्योतीप्रमाणे तळपत अनंतमती उभी होती.

"हे काय आहे ?" असुराने भयपूर्वक विचारले. रुद्र अतिशय शांतपणे उभा होता.

"पाताळाच्या खोलीतून बोलावलं गेलेला दूत. तुला नरकाची वाट दाखवायला" अनंतमतीने सांगितले. शुक अजून सुद्धा हलू शकत नव्हता. असुराचा हात अजून त्याच्या पोटांत होता.

एक कुत्सित हास्य देऊन असुराने आपले डोळे लाल केले. "पण माझ्या छायाविद्येने तुझा आत्मा माझ्या कबजांत आहे आणि त्या मानवाचे शरि सुद्धा. रुद्राला वापरण्यासाठी तुम्हा दोघां पैकी एकाने मला स्पर्श करणे आवश्यक आहे. रुद्र उपस्थितीत असला तरी तुम्हाला त्याची काहीही मदत नाही. ".

"आणि किती वेळ तू सावलीने आम्हाला बांधून ठेवशील ? कारण तितका वेळ तुला सुद्दा हलता येणार नाही" तिने सांगितले.

शुक दोघांचा संवाद ऐकत होता पण त्याला विशेष काही समजत नव्हते. त्याला अजून तिळभर सुद्धा हालत येत नव्हते. असुरी हात सावली रूपाने त्याच्या शरीरांत पेशी पेशींत समावत होता.

"किती वेळ ? जास्त वेळ नाही कारण हा मानव आहे. हा काही क्षणात मारून जाईल. त्याचबरोबर तुझा आत्मा सुद्धा गायब होईल. तुला दासी करून माझ्या साथीदारांची रखेल म्हणून ठेवण्याचा इरादा होता पण कदाचित आतां तुझ्या मृत्युवरच मला समाधान मानावे लागेल. माझ्या बरोबर असतीस तर किमान जिवंत तरी असतीस. " असुराने म्हटले.

आपली प्राणशक्ती कमी होत आहे ह्याची जाणीव शुकाला झाली. आपण मारून जाऊ का ? ह्यांतून काही मार्ग आहे का ? त्याने विचार केला. आता त्याला एकाच मार्ग दिसत होता. रुद्राला आवाहन करण्यासाठी शत्रूच्या शरीराला स्पर्श करणे आवश्यक होते पण सध्या त्याचे दोन्ही हात जोडलेले होते. म्हणजे त्याने स्वतःला स्पर्श केला होता.

शुकाचे विचार जणू काही यक्षिणीने ओळखले.  "बरोबर आहे शुक. तू रुद्राला स्वतःच्या शरीरांत अवधीत करू शकतोस आणि त्यामार्गे आपला आत्मा रुद्राला दान करू शकतोस बदल्यांत रुद्र ह्या असुराला सुद्धा नर्कांत घेऊन जाईल."

ते शब्द ऐकून असुर घाबरला. "काय ? शुक ऐकू नकोस हिचे. हि तुला वापरत आहे. रुद्राने नेले तर काय होते ठाऊक आहे का ? आम्ही अनंत काळ कुठल्यातरी नरकांत पडून राहू. त्यानून आमची पुन्हा कधीही सुटका नाही."

पण शुकाला भय वाटत नव्हते. आईविषयी प्रेम वाटत होते. "मानव क्षुद्र आहेत, त्यांना जास्त आयुष्य नसते त्यामुळे त्यांना जास्त सिद्धी शक्ती प्राप्त करता येत नाहीत तरी सुद्धा हजारो वर्षां पासून मानवजात मोठी होत गेलीय तर असुर, यक्ष, दैत्य, देव दैत्यांनी नामशेष होत गेलेत. हा योगायोग नाही. मानवांत बलिदान आणि त्याग नावाच्या दोन भावना असतात. जीवन त्यांच्या साठी अनमोल असले तरी अनेकदा निव्वळ अभिमान किंवा प्रेमापोटी मानव आपल्या  आहुती देऊ शकतात" अनंतमतीचे बोल त्याच्या कानावर पडत होते.

शुकाने आईकडे पहिले. तिच्या चेहऱ्यांत त्याला आता वात्सल्य दिसत नव्हते. ती ममता ते कारुण्य दिसत नव्हते. यक्षिणी अनंतमती अनंतकाळ जुन्या ताऱ्याप्रमाणे वस्तुनिष्ठ वाटत होती. पण त्याच्या हृदयांत प्रेम मात्र तसेच होते. त्याने आपल्या हातावर लक्ष केंदरीत करून रुद्राचे आवाहन केले. रुद्राचा एक हात वेगाने त्याचा मानगुटीवर बसला. तो हात सुद्धा सावलीप्रमाणे त्याचं शरीरांत घुसला. आणि त्याने शुकाच्या संपूर्ण शरीराची पकड घेतली. असुराने कदाचित हालचालत करण्याचा प्रयत्न केला असेल पण रुदरशक्तीने त्याचाही सावली सुद्धा पकडली होती. त्याच्याअ तोंडून काहीही शब्द आले नाही.

आता सुकाळ आपण नियंत्रणात आहोत असे वाटत होते पण शरीर अजूनही हलत नव्हते. "मला मुक्त कर शुक. माझा आत्मा मुक्त कर आणि दुसरे शरीर शोधेन जोपर्यंत तू स्वतःहून मला शरीरांतून मुक्त करत नाहीस तो पर्यंत मी जाऊ शकत नाही. मी सुद्धा तुझ्या बरोबर नर्कांत पोचेन. तुला ते हवे आहे का ?" तिने विचारले ?

"आई तू मला पुन्हा भेटणार नाहीस ? " शुकाने रडत रडत प्रश्न केला. तो अवघड परिस्तिथितीन होता. त्याच्या हृदयाचे अक्षरशः तुकडे होत होते पण त्याला आपलय आई कडून उत्तर हवे होते.

तेजोमयी वाटणारी यक्षिणी त्याच्या जवळ आली.

"प्रेम आणि द्वेष फार मोठी हत्यारे आहेत शुक. आम्हा यक्षिणींना ती फार चांगल्या प्रकारे वापरायला येतात. है असुरांचे निर्दालन करायचे होते तर काही तरी प्रचंड शक्ती मिळविणे आवश्यक होते. कितीतरी प्रियकर मी केले पण कुणीही हे काम करू शकला नाही पण माता पुत्राचे प्रेम वेगळेच असते हे मला जेंव्हा लक्षांत आले तेंव्हा मी पुत्राचा शोध घेतला. मला तू सापडलास. तुजयंत सर्व चिन्हे होती जी ह्या असुराला दिसणे शक्य नव्हती. तुला तंत्र विद्या, यंत्र साधना, वशीकरण काहीही शिकणे शक्य नव्हते. पण पृथ्वीतालावर वराहविद्या अजून रक्त संभावांच्या रूपांत होती ती तुला शक्य होती. रक्तसंभावांची मी सुद्धा एके काली शिष्य होते. देवी विद्या माझी बहीण आहे. मी तुला ह्याच दिवस साठी तयार केले होते पुत्र. तू माझ्यावर प्रेम केले असशील तर मला मुक्त कर आणि ह्या असुराला घेऊन पाताळांत जा" अनंतमातीने शांत पाने त्याला सांगितले. सुकाळ हा आपला विश्वास भंग आहे का मातेची आज्ञा आहे हे समाजाने कठीण गेले. कदाचित ते दोन्ही होते.

"शुक असे नको करुस. तिने तुझा जीव घेतलाय आणि तुला सुद्धा तो घेणे शक्य आहे. किमान तिला तरी आपल्या सोबत नर्कांत आण "  वेदनेने विव्हळत असुर बोलत होता.

शुकाने डोळे बंद केले आणि मातेला मुक्त केले. त्याच्या चेहरासमोर त्याच्या आईचा चेहरा आला, चिरतरुण आणि कारुण्याने भरलेला.

"कुपुत्रो जायते कदाचित कुमाता ना भवती" हा श्लोक त्याने आपल्या आईकडूनच शिकला होता. माता माणूस नाही ती संकल्पना आहे, ती मूर्तिमंत पावित्र्य आहे. शुकाच्या मनांत मेटेंविषयी प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. त्याच्या डोळ्यापुढे अंधार आला आणि आपण खाली पडत आहोत असे त्याला वाटले. त्याने डोळे उघडायचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झाले नाही.