Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

भविष्यात काही घटना घडणे हे निश्चित असते तर काही घटनांच्या बाबतीत काहीही सांगता येऊ शकत नाही. भविष्याची निर्मिती एक मनुष्य, समूह किंवा संघटनेवर अवलंबून नसते तर त्यात नैसर्गिक तत्वांचे देखील योगदान असते. शक्यता अनेक आहेत, परंतु काही शक्यतांच्या बाबतीत ठोसपणे सांगता येऊ शकते.
तुम्ही खाली उभे असताना तुम्हाला हे सांगता येत नाही की १० मिनिटांनंतर तुमच्या भागात पाऊस पडणार आहे, पण जर तुम्ही उंचावर उभे असाल तर तुम्ही दूर कुठे पडणारा पाऊस पाहून खाली उभ्या असलेल्या लोकांना हे सांगू शकता की १० मिनिटांनंतर इथे पाऊस पडणार आहे, मग भले ते तुमच्यावर विश्वास ठेवोस अगर न ठेवोत. अशाच प्रकारे भविष्य पाहणारे वेगळ्या स्थानी उभे असतात आणि आपण सर्व त्यांच्यापासून खाली उभे असतो... शक्यता अनेक असतात आणि त्या शक्यतांपैकी कोणती एक शक्यता गृहीत धरून कोणीही भविष्यवाणी करते. इथे आम्ही घेऊन आलो आहोत पुराणांमध्ये लिहिलेल्या काही अशा भविष्यवाणी ज्या पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल...