Get it on Google Play
Download on the App Store

अशी जिंकली रावणाने लंका...

http://1.bp.blogspot.com/-9TRjLym01GU/VlSKEcurFII/AAAAAAAADag/kx3kj30wvQk/s1600/ravanaandbros.jpg

मय नावाचा एक राक्षस होता. त्याची मंदोदरी नावाची एक कन्या होती. ती खूपच सुंदर आणि स्त्रियांमध्ये शिरोमणी होती. तिच्याशी विवाह करून रावण प्रसन्न होता. आणि तिने विवाह केला कारण तिला माहिती होते की हा राक्षसांचा राजा होणार आहे. त्यानंतर रावणाने आपल्या दोन लहान भावांचा देखील विवाह करून दिला. समुद्राच्या मध्ये त्रिकुट नावाचा एक भलामोठा किल्ला होता. मय दानवाने त्याला पुन्हा सजवला. त्यामध्ये मनी जडलेले सोन्याचे अगणित महाल होते.
जशी नागकुळाची पाताळात भोगावतीपुरी आहे आणि इंद्राची राहण्याची अमरावतीपुरी आहे, त्यांच्यापेक्षा देखील सुंदर हा दुर्ग होता. हा दुर्ग संसारात लंका नावाने प्रसिद्ध झाला. त्याला चारही बाजूंनी अतिशय खोल अशा समुद्राने वेढलेले आहे. भगवंताच्या प्रेरणेने जो राक्षसांचा राजा असतो तोच शूर, प्रतापी, अत्यंत बलवान आपल्या सेनेसकट या पुरीमध्ये वास्तव्य करतो.
तिथे मोठमोठे राक्षस योद्धे राहत होते. देवतांनी त्या सर्वांना युद्धात मारून टाकले. आता इंद्राच्या प्रेरणेने तिथे कुबेराचे एक करोड रक्षक राहत होते. रावणाला ही बातमी लागली तेव्हा त्याने सेना सज्ज करून किल्ल्याला घेराव टाकला. त्याच्यासारखा महान योद्ध आणि त्याची अफाट सेना पाहून यक्ष तिथून पळून गेले. तेव्हा रावणाने फेरफटका मारून सर्व नगर पाहिले, त्याची चिंता मिटली. रावणाने त्या नगरला आपली राजधानी बनवले. ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रावणाने सर्व राक्षसांना लंकेत घरांचे वाटप केले. एकदा त्याने कुबेराशी युद्ध करून पुष्पक विमानही जिंकून घेतले.