Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

तैमूर लंगचे आक्रमण

http://images.patrika.com/mediafiles/2016/01/28/taimoor1-1453973107.jpg

तैमुर लंग याला चांगेज खान सारखा शासक बनायचे होते. इ.स.१३६९ मध्ये तो समरकंद चा शासक बनला. त्यानंतर त्याने आपली विजयाची आणि क्रौर्याची यात्रा सुरु केली. मध्य आशियातील मंगोल लोक या दरम्यान मुसलमान झालेले होते आणि तैमूर लंग स्वतः देखील मुसलमान होता. क्रौर्याच्या बाबतीत तो चांगेज खान प्रमाणेच होता. असे म्हणतात की एका ठिकाणी त्याने २ हजार जिवंत माणसांचा मनोरा रचला आणि त्यांना विटा आणि दगड यांच्यात चिणून टाकले.
जेव्हा तैमूर लंगने भारतावर आक्रमण केले, तेव्हा उत्तर भारतात तुघलक वंशाचे राज्य होते. इ.स. १३९९ मध्ये तैमूर लंगच्या दिल्ली वरील आक्रमणासोबतच तुघलक साम्राज्याचा अंत मानला गेला पाहिजे. तैमूर लंग मंगोल फौजा घेऊन आला तेव्हा त्याला कोणीही कडवा प्रतिकार केला नाही आणि तो कत्तल करत मजेत पुढे जात राहिला.
तैमूर लंगच्या आक्रमणाच्या वेळी हिंदू आणि मुसलमान दोघांनी मिळून जोहराचा राजपुती सोहळा केला होता म्हणजे युद्धात लढता लढता मृत्यू स्वीकारण्यासाठी बाहेर पडले होते. तो दिल्लीमध्ये १५ दिवस राहिला आणि त्याने या मोठ्या शहराचा कत्तलखान बनवून टाकला. पुढे काश्मीर लुटून तो समरकंदला निघून गेला. तैमूर लंग निघून गेल्यावर दिल्ली मुडद्यांचे शहर बनून राहिले होते.