Get it on Google Play
Download on the App Store

महमूद गजनी (997-1030)

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/5c/%D0%A4%D0%B8%D1%80%D0%B4%D1%83%D1%81%D0%B8_%D1%87%D0%B8%D1%82%D0%B0%D0%B5%D1%82_%D0%BF%D0%BE%D1%8D%D0%BC%D1%83_%C2%AB%D0%A8%D0%B0%D1%85-%D0%9D%D0%B0%D0%BC%D0%B5%C2%BB_%D1%88%D0%B0%D1%85%D1%83_%D0%9C%D0%B0%D1%85%D0%BC%D1%83%D0%B4%D1%83_%D0%93%D0%B0%D0%B7%D0%BD%D0%B5%D0%B2%D0%B8_(1913).jpg

अरबी लोकांनंतर तुर्कांनी भारतावर आक्रमण केले. अलप्तगीन नावाच्या एका तुर्क सरदाराने गजनी मध्ये तुर्क साम्राज्याची स्थापना केली. इ.स.९७७ मध्ये अलप्तगीन चा जावई सुबुक्तगीन याने गजनी वर शासन केले. सुबुक्तगीनच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र महमूद गजनवी गजनीच्या गाडीवर बसला. महमूद गजनवीने बगदादच्या खलिफाच्या आदेशानुसार भारताच्या अन्य भागांत आक्रमण करायला सुरुवात केली. त्याने भारतावर इ.स. १००१ पासून १०२६ च्या दरम्यान १७ वेळा आक्रमण केले. मथुरेवर त्याचे ९वे आक्रमण होते. त्याचे सर्वांत मोठे आक्रमण इ.स. १०२६ मध्ये काठीयावाडच्या सोमनाथ मंदिरावर होते. देशाच्या पश्चिम सीमेवर प्राचीन कुशस्थली आणि सध्याचे सौराष्ट्र गुजरात) इथे काठीयावाड मध्ये समुद्र किनाऱ्यावर सोमनाथ महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.

महमूद ने सोमनाथ मंदिरातील शिवलिंग तोडले. मंदिर उध्वस्त केले. असे म्हणतात की त्याने हजारो पुजाऱ्यांना ठार केले आणि तो मंदिराचे सोने आणि भारी खजिना लुटून घेऊन गेला. एकट्या सोमनाथ मंदिरातून त्याला आतापर्यंतची सर्वांत मोठी लूट मिळाली. त्याचे अंतिम आक्रमण इ.स. १०२७ मध्ये झाले. त्याने पंजाब आपल्या राज्यात सामील करून घेतले होते आणि लाहोरचे नाव बदलून महमूदपूर केले होते. महमूदच्या या आक्रमणांनी भारताचे राजवंश दुर्बल झाले आणि नंतरच्या वर्षांत विदेशी मुस्लीम आक्रमणांसाठी इथले द्वार उघडे झाले.