Get it on Google Play
Download on the App Store

रक्तबीज

रक्तबीज खूपच भयानक असुर होता. जमिनीवर जर त्याच्या रक्ताचा एक थेंब जरी पडला तर त्या थेंबातून त्याच्याच सारखा आणखी एक राक्षस जन्माला येत असे. अशा प्रकारे युद्धात जेव्हा त्याच्या रक्ताचे हजारो थेंब पडले तेव्हा त्यातून हजारो राक्षस जन्माला येऊन हाहाःकार माजवू लागले. हा भयानक प्रकार पाहून देवता देखील घाबरू लागले. सर्वजण विचारात पडले की आता याला मारावा तरी कसा?
हा रक्तबीज खरे म्हणजे आपल्या पूर्वजन्मात असुर सम्राट रंभ होता ज्याला इंद्राने तपश्चर्या करताना पाहून धोक्याने मारून टाकले होते. रक्तबीजाच्या रूपाने त्याने पुन्हा घोर तपश्चर्या केली आणि हे वरदान प्राप्त केले की त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब जमिनीवर पडला तर त्यातून एक आणखी रक्तबीज उत्पन्न होईल.
अखेर महादेवाच्या सांगण्यावरून कालीमातेने रक्तबीजाचा वध केला होता. शक्तीचा अवतार असलेल्या कालीमातेने रक्तबीजाचे मस्तक छाटून त्याचे रक्त प्रश्न केले जेणेकरून त्याच्या शरीरातील रक्ताचा एक थेंब देखील धरतीला स्पर्श करू शकणार नाही.