Get it on Google Play
Download on the App Store

विमाने आणि अणु अस्त्र

महाभारत काळात विमाने आणि अणु अस्त्र होती??
मोहेन जोदडो मध्ये काही असे सांगाडे मिळाले ज्यांच्यात किरणोत्सर्गाचा परिणाम आढळून आला. महाभारतात सौप्तिक पर्वाच्या १३ ते १५ अध्यायात ब्रम्हास्त्राचे परिणाम दिलेले आहेत. हिंदू इतिहासाच्या अभ्यासकांच्या मते इ.स.पु. ३ नोव्हेम्बर ५५६१ रोजी वापरण्यात आलेले ब्रम्हास्त्र अणुबॉम्ब होते..!?

http://smsmafia.net/wp-content/uploads/2016/07/2-deadly-weapons-used-in-the-mahabharat-that-could-easily-destroy-the-world5.jpg

महाभारतात याचे वर्णन मिळते :

‘तदस्त्रं प्रजज्वाल महाज्वालं तेजोमंडल संवृतम।।” ”सशब्द्म्भवम व्योम ज्वालामालाकुलं भृशम। चचाल च मही कृत्स्ना सपर्वतवनद्रुमा।।”
अर्थात - ब्रम्हास्त्र सोडल्यानंतर प्रचंड वायू जोरदार तडाखे मारू लागला. आकाशातून हजारो उल्का पडू लागल्या. भूतमात्रांना प्रचंड महाभय उत्पन्न झाले. आकाशात मोठा आवाज झाला. आकाश पेटू लागले. पर्वत, अरण्य, वृक्ष यांच्यासह पृथ्वी हादरली.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की खरंच आपल्या आजच्या तंत्राज्ञानापेक्षा महाभारतातील तंत्रज्ञान अनेक पटींनी प्रगत होते का?