Get it on Google Play
Download on the App Store

हवन (होम) काय आहे?

आपल्या जीवनाला चांगल्या कर्मांनी आणखी चमकवण्याचा संकल्प! आपली सर्व पापे, कपट, अपयश, रोग, खोटेपणा, दुर्भाग्य इत्यादीला या दिव्य अग्नीत जाळून टाकण्याचा संकल्प! प्रत्येक दिवशी एक नवी भरारी घेण्याचा संकल्प! प्रत्येक नवीन रात्री नवे स्वप्न पाहण्याचा संकल्प! त्या ईश्वर रुपी अग्नीमध्ये स्वतःला आहुती बनवून त्याचेच होऊन जाण्याचा संकल्प, त्या दिव्य ज्वाळेत आपली ज्वाला लावण्याचा संकल्प आणि या संसारातील दुःखांपासून मुक्त होऊन अग्नीप्रमाणे वर उठून मुक्त होण्याचा संकल्प! हवन माझ्या सफलतेचा मार्ग आहे, हवन माझा मुक्तीचा मार्ग आहे, ईश्वराला भेटण्याचा मार्ग आहे. हवन / यज्ञ / अग्निहोत्र मनुष्यासोबत नेहमीच चालत आलेला आहे. हिंदू धर्मात सर्वोच्च स्थानी विराजमान असलेला हवन आज मात्र सामान्य माणसापासून दूर जात आहे. दुर्दैवाने याला आज केवळ काही वर्ग, जाती आणि धर्मापर्यंत सीमित करण्यात आले आहे. कोणी याज्ञावर प्रश्न उठवत आहे तर कोणी चेष्टा करत आहे. या लेखाचा उद्देश आहे की जनमानसाला याची आठवण करून द्यावी की हवन का इतका पवित्र आहे, का यज्ञ करणे प्रत्येक माणसाचा अधिकारच नव्हे तर कर्तव्य देखील आहे. हा लेख कोणा विद्वानाचा नाही, संन्यासी माणसाचा नाही, हा लेख १०० कोटी हिंदूंचाच नाही तर ७ अब्ज मानवांचा प्रतिनिधी असलेल्या एका सामान्य माणसाचा आहे ज्यामध्ये प्रत्येक चांगला माणूस आपली छबी पाहू शकेल. हा लेख तुमच्यासारख्याच एका माणसाच्या हृदयाचा आवाज आहे ज्याला तुम्ही देखील तुमच्या हृदयात अनुभवू शकता.