Get it on Google Play
Download on the App Store

माता पार्वतीचे वाहन वाघ

http://s3.india.com/wp-content/uploads/2015/10/Maa-Chandraghanta-.jpg

माता पार्वतीचे वाहन वाघ आहे तर दुर्गमातेचे वाहन सिंह. दुर्गामातेला शेरावाली म्हटले जाते. वाघ तर माता पार्वतीचे वाहन आहे. वाघ अमोघ साहस, क्रौर्य, आक्रमकता आणि शौर्याचे प्रतिक आहे. ही तीन वैशिष्ट्ये माता पार्वतीच्या आचरणात देखील आढळून येतात. वाघाच्या डरकाळीच्या पुढे विश्वातील बाकी सर्व आवाज कमजोर वाटतात.
माता पार्वतीचे हृदय अतिशय कोमल आहे. मातेची पूजा जर मनापासून आणि श्रद्धेने केली तर अनेक अडचणी दूर होतात, परंतु जर मातेचा कोणत्याही रुपात अपमान झाला किंवा तिला विरोध केला गेला तर तिचा क्रोध थरकाप उडविणारा असतो. अनेक लोक नवस बोलतात, परंतु इच्छित साध्य झाल्यानंतर तो पूर्ण करत नाहीत तेव्हा माता आपल्या पद्धतीने भक्ताला त्याची आठवण करून देते.
एक दिवस माता पार्वती आणि भगवान शंकर सोबत बसले होते. गमतीत शंकराने पार्वतीला काळी म्हटले. मातेला ते फार लागले आणि ती कैलास सोडून वनात निघून गेली आणि कठोर तपश्चर्येत लीन झाली. त्याच दरम्यान एक भुकेला वाघ मातेला खाण्याच्या इच्छेने तिथे आला परंतु तो तिथेच गपचूप बसला.
मातेच्या प्रभावाखाली तो वाघ देखील तपश्चर्या करणाऱ्या मातेच्या सोबत तिथेच अनेक वर्ष बसून राहिला. मातेने निश्चय केला होता की जोपर्यंत ती गोरी होत नाही तोपर्यंत तिथेच तप करणार. तेव्हा शंकर तिथे प्रकट झाले आणि देवीला गोरी होण्याचे वरदान देऊन निघून गेले. मग मातेने जवळच्या नदीत स्नान केले आणि मग पाहिले की एक वाघ तिथे गपचूप बसून तिला लक्षपूर्वक पाहत होता. मातेला जेव्हा समजले की तो वाघ तिच्या सोबत तपश्चर्येत इतकी वर्षे इथे बसून राहिला आहे तेव्हा मातेने प्रसन्न होऊन त्याला वरदान म्हणून आपले वाहन बनवले. तेव्हापासून वाघ माता पार्वतीचे वाहन बनला.
दुसऱ्या कथेनुसार संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेल्या 'स्कंद पुराणा'चा तमिळ अनुवाद 'कांडा पुराणम' मध्ये उल्लेख आहे की देवासून संग्रामात शिवाचा पुत्र मुरुगन(कार्तिकेय) याने दानव तारक आणि त्याचे दोन भाऊ सिंहामुखम आणि सुरापदम्न यांना पराजित केले होते.
आपल्या पराजयावर सिंहामुखमने माफी मागितली तर मुरुगनने त्याला एक सिंह बनवला आणि आपली माता दुर्गा हिच्या वाहनाच्या रुपात तिची सेवा करण्याचा आदेश दिला.