Get it on Google Play
Download on the App Store

माता सरस्वतीचे वाहन हंस

हंस हा पवित्र, जिज्ञासू आणि समजूतदार पक्षी असतो. तो जीवनाच्या अंतापर्यंत एकाच हन्सिणी सोबत राहतो. परिवारातील प्रेम आणि एकता यांचे हे सर्वांत श्रेष्ठ असे उदाहरण आहे. याव्यतिरिक्त हंस आपल्या निवडक स्थानांवरच वास्तव्य करतो. त्याचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे इतर पक्षांपेक्षा तो उंच भरारी मारतो आणि सर्वांत जास्त अंतर उडत कापण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. जे ज्ञानी असतात ते हंसासारखेच असतात आणि जे बुद्धत्व प्राप्त करतात त्यांना परमहंस म्हटले गेले आहे.
ज्ञानाची देवी असलेल्या माता सरस्वतीसाठी सर्वांत उत्तम वाहन हंसच होऊ शकत होता. माता सरस्वतीचे हंसावर विराजमान होणे हेच सांगते की ज्ञानानेच जिज्ञासा शांत केली जाऊ शकते. ज्ञानानेच जीवनात पवित्रता, नैतिकता, प्रेम आणि सामाजिकता यांचा विकास होतो. ज्ञान काय आहे? जे जे काही अज्ञात आहे त्याला जाणून घेणे हेच ज्ञानी होण्याचे प्रथम लक्षण आहे.