Get it on Google Play
Download on the App Store

भीष्म

http://i9.dainikbhaskar.com/thumbnail/680x588/web2images/religion.bhaskar.com/2015/01/25/3765_bhishma_ashtmi_.jpg

शांतनु-गंगा यांचा पुत्र भीष्म यांचे नाव देवव्रत होते. त्या इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त होते.

भीष्म शरशय्येवर पडल्याचे ऐकून कौरवांच्या सेनेत हाहाःकार माजला. दोन्ही दलांचे सेनापती आणि सैनिक युद्ध बंद करून भीष्मांच्या जवळ जमले. दोन्ही दलांच्या राजांना भीष्म म्हणाले की माझे मस्तक खाली लोंबते आहे, मला उचित उशी पाहिजे. त्यांच्या आदेशानुसार सर्व राजांनी विविध प्रकारच्या मौल्यवान उशा आणल्या.

परंतु भीष्मांनी त्यातील एकही घेतली नाही आणि हसून म्हणाले, की यातील एकही उशी या शरशय्येसाठी योग्य नाहीये. मग ते अर्जुनाला म्हणाले, बाळ, तू तर क्षत्रिय धर्माचा विद्वान आहेस, तू मला योग्य उशी आणून देऊ शकतोस? त्यांची आज्ञा होताच अर्जुनाने डोळ्यांत अश्रू घेऊन त्यांना वंदन केले आणि भीष्मांना वेगाने ३ बाण मारले जे त्यांच्या कपाळाला छेदून जमिनीमध्ये घुसले. अशा प्रकारे मस्तकाला आधार मिळाला आणि मस्तक लटकत राहण्याचा त्रास कमी होत गेला.