Get it on Google Play
Download on the App Store

समाप्ती

ही संस्कृती मुख्यतः इ. स. पू. २५०० पासून इ. स. पू. १८०० पर्यंत नांदली. असे वाटते की ही संस्कृती आपल्या अंतिम चरणात ऱ्हासोन्मुख होती. या काळातील घरांमध्ये जुन्या विटांचा उपयोग केल्याची माहिती मिळते. तिच्या विनाशाच्या कारणांवर विद्वानांत एकमत नाहीये. सिंधू संस्कृतीच्या समाप्तीच्या मागे विविध तर्क केले जातात जसे - बर्बर आक्रमण, जलवायू परिवर्तन आणि परिस्थितीक असंतुलन, पूर आणि भू-गर्भीय बदल, महामारी, आर्थिक कारण. असे वाटते की या संस्कृतीच्या पतनाच्या मागे कोणतेही एक कारण नसावे तर विविध कारणांच्या मेळाने असे झाले असावे. जी कदाचित वेगवेगळ्या वेळी घडली असतील किंवा कदाचित एकाच वेळी. मोहेंजोदडो मध्ये नगर आणि पाण्याचा निचरा करण्याची यंत्रणा पाहता महामारी ही संभावना कमी वाटते. भीषण अग्निकांडाच्या देखील खुणा मिळाल्या आहेत. मोहेंजोदडोच्या एका खोलीत १४ माणसाचे सांगाडे मिळाले आहेत जे आक्रमण, अग्नितांडव, महामारी यांचे संकेत आहेत.