Get it on Google Play
Download on the App Store

शेती आणि पशुपालन

आजच्या तुलनेत सिंधू प्रदेश पूर्वेला खूपच सुपीक होता. इसवी सन पूर्व चौथ्या शतकात सिकंदरच्या एका इतिहासकाराने म्हटले होते की सिंध प्रांत या देशाच्या सुपीक क्षेत्रात गणला जात होता. पूर्वीच्या काळी नैसर्गिक वनस्पती खूप होत्या ज्यामुळे इथे चांगला पाऊस होत असे. विटा गरम करण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी इथल्या वनांतून मोठ्ठ्या प्रमाणावर लाकडे आणण्यात आली ज्यामुळे हळू हळू वनांचा विस्तार कमी होत गेला. सिंधूच्या जमिनीचा कस चांगला असण्याला सिंधू नदीला दरवर्षी येणारा पूर हे देखील एक कारण होते. गावाच्या रक्षणासाठी बांधलेली पक्क्या विटांची भिंत याच गोष्टीकडे निर्देश करते की पूर दर वर्षी येत असे. इथले स्थानिक लोक पूर ओसरल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पूर आलेल्या मैदानात पेरणी करत असत आणि पुढचा पूर येण्यापूर्वी एप्रिल महिन्यात गहू आणि जवाचे पिक कपात असत. इथे कोणतेही फावडे किंवा नांगर मिळाला नाही परंतु कालीबंगाच्या प्राक्-हडप्पा संस्कृतीच्या ज्या खुणा मिळाल्या आहेत त्यांच्यावरून असे वाटते की राजस्थानात त्या काळात नांगर जुंपले जात होते.
सिंधू संस्कृतीतील लोक गहू, जव, राय, मटार, ज्वारी इत्यादी धान्ये उगवत असत. ते दोन प्रकारचे गहू उगवत असत. बनावली मध्ये मिळालेले जव उत्कृष्ट दर्जाचे आहे. याव्यतिरिक्त ते तीळ आणि मोहरी देखील उगवत असत. सर्वांत आधी कापूस देखील इथेच उगवण्यात आला. त्याच्याच नावावरून युनान चे लोक याला सिंडन (Sindon) म्हणू लागले. हडप्पा अशा प्रकारे एक कृषिप्रधान संस्कृती होती, परंतु इथले लोक पशुपालन देखील करत असत. गाय, बैल, म्हैस, रेडा, बकरी, डुकर आणि मेंढ्या पाळल्या जात असत. हडप्पातील लोकांना हत्ती आणि गेंड्याचे ज्ञान होते.