Get it on Google Play
Download on the App Store

लीओन त्रबुको चा खजिना

१९३० साली अमेरिकेत मंदीची लाट आली होती आणि अमेरिकेच्या सरकारला सोन्याची नितांत आवश्यकता होती. अशा परिस्थितीत सोन्याचे भाव गगनाला भिडले होते आणि त्याच दरम्यान मेक्सिकोमध्ये खर्वपती व्यापारी लिओन त्रबुको याने मेक्सिकोच्या वाळवंटाच्या वरून खूप वेळा हवाई उड्डाण केले. या खर्वपती व्यापाऱ्याने आपल्या अनेक मित्रांसोबत मिळून अवैध सोन्याचा साठा याच वाळवंटात कुठेतरी लपवून ठेवला होता जो जवळ जवळ १६ टन इतका प्रचंड होता आणि हे सर्वजण याच आशेवर होते की लवकरच सोन्याचे दर भरमसाठ वाढतील आणि तेव्हा या सोन्याची तस्करी करून त्यातून अमाप पैसा मिळवता येईल. परंतु तेव्हाच अमेरिकन सरकारने एक ऐतिहासिक बिल पास केले, ज्यात ठरवण्यात आले की सोन्याचा खाजगी मालकी हक्क समाप्त करण्यात येत आहे. अशात या खजिन्याला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यात आले. अर्थात नंतर हे बिल रद्द करण्यात आले होते, परंतु तोपर्यंत लिओन आणि त्याच्या मित्रांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खजिन्याचा शोध काही लागला नाही.