Get it on Google Play
Download on the App Store

युद्धविरामाच्या दिशेने वाटचाल

27 November 1948 - 31 December 1948
युद्धाच्या या स्थितीत पोचल्यावर भारतीय पंतप्रधानांनी प्रकरण संयुक्त राष्ट्र महासभेत नेऊन त्यांच्याकडून तोडगा काढण्याचा निश्चय केला होता. ३१ डिसेंबर १९४८ ला संयुक्त राष्ट्रातर्फे युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. युद्धविराम होण्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानी सैन्याने एक प्रती आक्रमण करून उरी आणि पुंछ यांच्या मधील मार्गावर कब्जा करून दोन्हीच्या मधला रस्ता संपर्क तोडला. एका मोठ्या मोलभावानंतर दोन्ही पक्ष युद्धाविरामासाठी तयार झाले. या युद्धाविरार्माच्या अटी १३ ऑगस्ट १९४८ रोजी संयुक्त राष्ट्राने मान्य केल्या. त्यामध्ये पाकिस्तानने आपल्या नियमित आणि अनियमित सैनिकांना पूर्णपणे काढून घेणे आणि भारताने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक सैनिक तैनात करण्याचा प्रस्ताव होता. ही अट पूर्ण झाल्यावर जनमताचा संग्रह करून राज्याचे भविष्य आणि मालकी हक्क ठरवण्याचा निर्धार होता. या युद्धात उभय पक्षांचे प्रत्येकी १५-१५ शे सैनिक शहीद झाल्याचा अंदाज आहे. आणि या युद्धानंतर भारताचा राज्यावर ६०% तर पाकिस्तानचा ४०% कब्जा राहिला.