Get it on Google Play
Download on the App Store

क्राइस्ट द रिडीमर

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/0/06/O_Cristo_Redentor.JPG

क्राइस्ट द रिडीमर ब्राझिलच्या रियो डी जेनेरो मध्ये स्थापित असलेली ईसा मसीहाची एक प्रतिमा आहे जिला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी आर्ट डेको स्टेच्यू मानले जाते. ही मूर्ती आपल्या ९.५ मीटर (३१ फूट) आधारसाहित ३९.६ मीटर (१३० फूट) उंच आणि ३० मीटर (९८ फूट) रुंद आहे. तिचे वजन ६३५ टन आहे आणि फोरेस्ट नेशनल पार्क मध्ये कोर्कोवाडो पर्वताच्या शिखरावर स्थित आहे (७०० मीटर - २३०० फूट) जिथून संपूर्ण शहर दिसते. ही जगातील अशा प्रकारच्या सर्वांत उंच मुर्तींपैकी एक आहे. बोलिव्हियाच्या कोचाबम्बा मध्ये असलेली क्राइस्टो डी ला कोनकोर्डियाची मूर्ती याच्यापेक्षा थोडी अधिक उंच आहे. ईसाई धर्माचे एक प्रतीक असलेली ही मूर्ती रियो आणि ब्राझिलची एक वेगळी ओळख बनली आहे. ती मजबूत कॉंक्रीट आणि सोपस्टोन पासून बनली आहे. हिची निर्मिती १९२२ ते १९३१ च्या मध्ये झाली होती.