Get it on Google Play
Download on the App Store

सत्यभामा, गरूड आणि सुदर्शन यांचे गर्वहरण

भगवान श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार मानले जाते. विष्णूनेच रामाच्या रूपाने अवतार घेतला आणि विष्णूनेच श्रीकृष्ण म्हणूनही अवतार घेतला. श्रीकृष्णाच्या आठ पत्नी होत्या - रुक्मिणी, जाम्बवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रबिंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. यापैकी सत्यभामा हिला आपले सौंदर्य आणि महाराणी पद यांच्याबद्दल गर्व होऊ लागला होता तर दुसरीकडे सुदर्शन चक्र स्वतःला सर्व शक्तिमान समजत होते. त्यासोबतच विष्णूचे वाहन गरुड याला देखील आपण सर्वात वेगाने उडतो याचा गर्व झाला होता.श्रीकृष्णाला हे माहिती होते की भीमाला देखील आपल्या शक्तीचा प्रचंड गर्व होता. कृष्णाने योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा केली आणि आपल्या लीलेने एका घटनेची रचना केली. एकदा वनवासात असताना द्रौपदीला एक सहस्त्रदली कमळ दिसले. तिने ते घेतले आणि भीमाला तसेच आणखी एक कमळ आणून देण्यास सांगितले. भीम कमळ आणायला निघाला. वाटेत त्याला गंधमादन पर्वतावर एक मोठे थोरले केळीचे वन दिसले. भीम त्याच्यात घुसला.

याच वनात हनुमान राहत असे. त्याला भीम आलेला समजले, हनुमानाने विचार केला की इथून पुढे स्वर्गाच्या वाटेवर जाणे भिमासाठी हानिकारक ठरेल. तेव्हा तो भीमाच्या रस्त्यात अडवा पडला. भीम तिथे पोचला आणि त्याने हनुमानाला वाट देण्यास सांगितले. तेव्हा हनुमान म्हणाला, "इथून पुढे पर्वत मनुष्यासाठी अगम्य आहे, तेव्हा तू इथूनच परत फिर."


http://img6a.flixcart.com//image/av-media/movies/b/c/c/bheem-and-hanuman-the-sons-of-vayu-400x400-imad2pygwbxefdk6.jpeg

यावर भीम उद्दामपणे म्हणाला, "मी जगेन किंवा मरेन, तुला काय करायचं? तू उठून मला रस्ता दे." हनुमान म्हणाला, "रोगाने ग्रस्त असल्यामुळे मी उठू शकत नाही, तू मला ओलांडून पुढे जा." भीम म्हणाला, "परमात्मा सर्व प्राण्यांच्या देहात आहे. कोणालाही ओलांडून त्याचा अपमान करता कामा नये." तेव्हा हनुमान म्हणाला, "तू माझी शेपटी उचलून तुझ्या वाटेतून बाजूला कर आणि पुढे जा."

भीमाने हनुमानाची शेपटी पकडून जोरात खेचली, परंतु ती जराही जागची हलली नाही. खूप प्रयत्न करून तो थकला. भीमाचा चेहेरा शरमेने लाल झाला. त्याने क्षमा मागितली आणि परिचय विचारला. तेव्हा हनुमानाने स्वतःचा परिचय करून दिला आणि म्हणाला की महाभारत युद्धाच्या वेळी मी तुमचे सहाय्य करेन. प्रत्यक्षात विनम्रता हीच शक्तीला पूजनीय बनवते, त्यामुळे स्वतःच्या शक्तीचा अहंकार बाळगू नकोस, तिचा सत्कार्यासाठी उपयोग करून समाजात आदरणीय बनावे.

दुसरा प्रसंग अर्जुनाशी निगडीत आहे. आनंद रामायणात वर्णन आहे की अर्जुनाच्या रथावर हनुमानाने विराजमान होण्यामागे देखील कारण आहे. एकदा कोणत्यातरी रामेश्वरम तीर्थावर अर्जुन हनुमानाला भेटला. या पहिल्या भेटीत अर्जुन हनुमानाला म्हणाला, "राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी तर तुम्ही होतात!"

हनुमान म्हणाला, "हो". तेव्हा अर्जुन म्हणाला, "आपले स्वामी श्रीराम तर सर्वश्रेष्ठ धनुर्धर होते. मग त्यांनी समुद्र पार करण्यासाठी दगडांचा सेतू बांधण्याचे करणाच काय? जर मी तिथे असतो तर समुद्रावर बाणांचा सेतू बांधला असता ज्याच्यावरून संपूर्ण वानर दल समुद्र पार करून गेले असते."

यावर हनुमान म्हणाला, "अशक्य. बाणांचा सेतू तिथे काही कामाचा नव्हता. जर आमचा एक जरी वानर त्याच्यावर चढला असता तर तो सेतू मोडून गेला असता."

अर्जुन म्हणाला, "नाही. हे बघा, इथे समोर सरोवर आहे, मी त्याच्यावर बाणांचा सेतू बांधतो, तुम्ही त्याच्यावर चढून सरोवर सहजपणे पार करून जाऊ शकाल."

हनुमान म्हणाला, "अशक्य."

तेव्हा अर्जुन म्हणाला, "जर तुमच्या चालण्याने सेतू मोडला तर मी अग्नीत प्रवेश करेन आणि जर सेतू नाही मोडला तर तुम्हाला अग्नीत प्रवेश करावा लागेल."

हनुमान म्हणाला, "मान्य आहे. माझी दोन पावले जरी त्याने सहन केली तर मी हार मान्य करेन."

तेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड बाणांनी सेतू तयार केला. जोपर्यंत सेतू बांधून झाला नव्हता, तोपर्यंत हनुमान आपल्या लघू रूपातच राहिला. पण जसा सेतू तयार झाला, हनुमानाने विराट रूप धारण केले.

हनुमान रामाचे स्मरण करत त्या सेतूवर चढला. पहिले पाऊल ठेवताच संपूर्ण सेतू डगमगू लागला. दुसरे पाउल ठेवताच करकरला आणि तिसरे पाउल ठेवताच सरोवराच्या पाण्यात रक्तच रक्त झाले.

तेव्हा हनुमान सेतूवरून खाली उतरून आला आणि अर्जुनाला म्हणाला की अग्नी तयार कर. अग्नी प्रज्वलित झाला आणि आता हनुमान अग्नीत प्रवेश करणार तोच तिथे भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले "थांबा." तेव्हा अर्जुन आणि हनुमानाने त्यांना प्रणाम केला.

कृष्णाने सर्व प्रसंग समजल्यावर म्हटले, "हनुमान, जेव्हा तू तिसरे पाऊल सेतूवर ठेवले, तेव्हा मी कासव बनून सेतूच्या खाली झोपलेलो होतो. तुझ्या शक्तीने तू पाऊल ठेवताच माझ्या कासव रूपातून रक्त वाहू लागले. जर मी तिथे झोपलेलो नसतो तर पहिल्या पावलातच सेतू मोडला असता."

हे ऐकून हनुमानाला खूप वाईट वाटले. त्याने क्षमा मागितली. "मी तर खूप मोठा अपराधी आहे. मी तुमच्या पाठीवर पाय ठेवला. माझा हा अपराध कसा दूर होईल देवा?" यावर कृष्णाने सांगितले, "हे सर्व माझ्या इच्छेने झाले आहे. तू खिन्न होऊ नकोस आणि माझी इच्छा आहे की तू अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर स्थान ग्रहण कर."

म्हणूनच द्वापार युगात श्री हनुमान अर्जुनाच्या रथाच्या वर ध्वज घेऊन बसलेला असतो.