Get it on Google Play
Download on the App Store

माता

http://www.craftsofindia.com/posters/pt1053.jpg

भारतामध्ये एक सरस्वत समाज आहे. बहुतेक  सरस्वती  नदीच्या किनारी वसती केल्यामुळे हे नाव पडले असावे, जसे शरयूपारीय ब्राम्हण म्हणजे शरयू नदीच्या आसपास राहणारे ब्राम्हण.
हिंदू धर्मातील तीन प्रमुख देविंपैकी एक असलेल्या माता सरस्वतीला ज्ञानाची देवी मानले गेले आहे. हंसावर आरूढ झालेल्या माता सरस्वतीने धवल वस्त्र परिधान केलेली आहेत. तिच्या हातात वीणा आहे. संगीत, कला, शिक्षण आणि ज्ञानाची देवी आहे माता सरस्वती. देवी सरस्वतीच्या नावानेच एका नदीचे नाव सरस्वती पडले होते, जी प्राचीन काळी शिवालिक च्या डोंगरामधून निघून हरियाणा आणि राजस्थान मध्ये वाहत होती ऐन सिंधू खाडीला जाऊन मिळत असे.