Get it on Google Play
Download on the App Store

सती आणि पार्वती

http://www.godshiva.net/wp-content/uploads/2012/11/Aadi-Sakti-parvati-Mata.jpg

हिंदू धर्माच्या प्रमुख तीन देवींपैकी एक माता पार्वतीला शक्ती आणि साहसाची देवी मानले गेले आहे. पार्वती माता आपल्या मागील जन्मात सती होती. सती हीच शक्ती आहे. माता सातीचीच रूपे आहेत - काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला.
पुराणानुसार भगवान शंकराच्या चार पत्नी होत्या. पहिली सती जिने यज्ञात उडी घेऊन स्वतःचा जीव दिला होता. हीच सती दुसऱ्या जन्मात पार्वती बनून आली, जिचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय आहेत. शंकराची एक तिसरी पत्नी होती जिला उमा म्हणत. देवी उमाला भूमीची देवी देखील म्हटलेले आहे. भगवान शंकराची चौथी पत्नी माता महाकाली (काली नव्हे) आहे. तिने या पृथ्वीवर भयानक दानवांचा संहार केला होता.
प्रजापती द्क्ष ची कन्या सती हिला शैलपुत्री देखील म्हटले जायचे आणि तिला आर्यांची राणी देखील म्हटले जायचे. दक्ष चे राज्य हिमालयाच्या काश्मीर भागात होते. ही देवी कश्यप ऋषींसोबत मिळून दानवांचा संहार करत असे. आपला पती भगवान शंकराचा अपमान झाल्यामुळे सतीने आपला पिता दक्ष याच्या यज्ञात उडी घेऊन आपली देहलीला समाप्त केली होती. माता सतीचे प्रेत घेऊन भगवान शंकर जागोजागी भटकत राहिले होते. जिथे जिथे माता सतीचे अंग आणि दागिने पडले, तिथे तिथे शक्तिपीठे निर्माण होत गेली.
यानंतर माता सतीने पर्बातीच्या रुपात हिमालयराजाच्या घरी जन्म घेऊन भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली आणि पुन्हा त्यांना प्राप्त करून पार्वतीच्या रूपाने जगात प्रसिद्ध झाली. गणेश आणि कार्तिकेय हे तिचे दोन प्रमुख पुत्र आहेत. तिचा विशेष दिवस शुक्रवार मानलेला आहे.