Get it on Google Play
Download on the App Store

सत्य नारायणाचे व्रत परम श्रेष्ठ का आहे ?

धर्माची ४ पदे आहेत. सत्य, शौच, तप आणि दान. यामध्ये सत्य हाच प्रधान धर्म आहे. सत्यावरच लोकांचा व्यवहार टिकून आहेत आणि सत्यामध्येच ब्रम्ह प्रतिष्ठित आहे, म्हणूनच सत्यस्वरूप भगवान सत्यनारायणाचे व्रत परम श्रेष्ठ मानले गेले आहे.
परंतु दुर्दैवाने धर्माच्या ठेकेदारांनी सत्याच्य जागी धर्माची उलट्या क्रमाने दान, तप आणि शौच यांच्या भौतिक रूपांत रुपांतरीत करण्याची प्रथा स्थापित केली आणि ती देखील अशा प्रकारे की त्यात स्वतःच्या लाभाची स्थिती अबाधित राहील. दानाच्या नावावर पुरोहित आणि पंडित समाजाच्या झोळ्या भरणे, तापाच्या नावाखाली एक - दोन दिवस उपाशी राहणे, कर्मकांडात अलिप्त राहणे आणि पुरोहित वर्गाला भोजन करवणे, शौच च्या नावाखाली स्पृश्य - अस्पृश्य अशा फडतूस रूढी निर्माण करणे आणि शुद्धीकरणाच्या नावाखाली ठगबाजी करणे. अशा पाखंडी लोकांच्या महाजालात सत्यनारायण भगवानाची पूजा कशी सुटली असती?
मन, कर्म आणि वचन यांनी सत्य धर्माचे पालन करणे अतिशय कठीण आहे, म्हणूनच यजमान देखील पुरोहित जसे सांगेल तसेच करत राहण्यात आनंद मानतो. त्याचे पाप-पुण्य देखील त्यांच्याच माथी जाईल. धार्मिक म्हणवून घ्यायला यापेक्षा सोपा आणि सुलभ मार्ग कोणता असेल? या विचारसरणीचा परिणाम सत्यनारायण व्रताच्या बाबतीत असा झाला की या व्रतामधून पूजा आणि आराधनेचे तत्व लुप्त होऊन गेले, सत्याची आस विलीन होऊन गेली आणि केवळ कथा वाचणे आणि ऐकणे यांचा अभिनय प्रधान होऊन गेला.
काही काही ठिकाणी या कथेचा अनुवाद देखील वाचून दाखवला जातो. परंतु तिथे देखील जी कथा ऐकवली जाते त्यामध्ये उपलब्ध प्रसंगांच्या मदतीने उदाहरणासहित हे सांगितले जाते की कथा ऐकल्याने निर्धन व्यक्ती धनाढ्य आणि पुत्रहीन व्यक्ती पुत्रवान होतो. राज्यच्युत व्यक्तीला राज्यप्राप्ती होते, दृष्टिहीन व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते, बंदी बंधनातून मुक्त होतो, आणि भीतीग्रस्त व्यक्ती भीतीपासून मुक्त होतो. अधिक काय सांगावे? व्यक्ती ज्या ज्या म्हणून वस्तूची इच्छा धरते ती ती वस्तू तिला मिळते. आणि त्यातून पुन्हा जी व्व्याक्ती या कथेचा अनादर करते तिच्यावर घोर आपत्ती येतात आणि दुःखांचे डोंगर कोसळतात. सत्यनारायण भगवान त्याला शाप देतात वगैरे वगैरे....