Get it on Google Play
Download on the App Store

प्रतिसर्ग पर्व

ऐतिहासिक आणि आधुनिक घटनांचे सुंदर मिश्रण. ईसा मसीहाचा जन्म, त्याची भारत यात्रा, मुहम्मद साहिब चा अविर्भाव, महाराणी व्हिक्टोरिया चे राज्यारोहण, इत्यादींचे वर्णन.
सतयुग, त्रेता युग (सुर्यवंश आणि चंद्रवंश), द्वापार युग आणि कलियुगातील राजे आणि त्यांच्या भाषा, 'नूह' ची प्रलय गाठ, मगध चा राजा नन्द, बौद्ध राजा, चौहान व परमार वंश, राजा विक्रम आणि वेताळ यांच्या शिक्षाप्रद कथा, 'वेताळ पंचविशी', रुपसेन तथा वीरवर, हरिस्वामी, राजा धर्मबल्लभ तथा मन्त्री सत्यप्रकाश, जीमूतवाहन तथा शंखचूड़, गुणाकर, चार मूर्ख, मझले भाई यांच्या रोचक व शिक्षाप्रद कथा. श्री सत्यनारायण व्रतकथेचे पूजन, विधिसहित विस्तृत वर्णन ज्यामध्ये शतानन्द ब्राह्मण, राजा चन्द्रचूड, लाकुडतोड्या, साधु वणिक आणि त्याचा जावई यांच्या कथा वर्णिलेल्या आहेत. दुर्गादेवीच्या सप्तशती मध्ये वर्णित त्यांचे तीन चरित्र, कात्यायन एवं मगधराज महानन्द, देवी सरस्वती च्या कृपेने महर्षी पतंजली यांच्याकडून कात्यायन यांना शास्त्रार्थात पराजित करण्याची कथा. भारताचा जवळपास इ.स.१००० नंतरचा इतिहास. ईसा मसीह, पैगम्बर मुहम्मद, शंकराचार्य, कृष्णचैतन्य, पृथ्वीराज चौहान, अकबर, जयचन्द, तैमूरलंग, रामानुज, कुतुबुद्दीन ऐबक इत्यादींचे वर्णन. या पर्वात शंकराचार्यांना भगवान शंकराचा तर रामानुजाचार्यांना भगवान विष्णूंचा अंशावतार म्हटलेले आहे. तसेच काशीमध्ये त्यांच्यात झालेल्या रोचक शास्त्रार्थाचे वर्णन केलेले आहे.