Get it on Google Play
Download on the App Store

*कलिंगडाच्या साली 34

असें बोलत आम्ही चाललो होतो. आणि लहान लहान झोंपड्या दिसू लागल्याय एका झोंपडीजवळ आम्ही आलो. झोंपडीचे दोन भाग होते. एका भागांत बकर्‍या बांधलेल्या होत्या. दुसर्‍या भागांत माणसे राहत. एकीकडे बकर्‍यांची पोरें, दुसरीकडे आदिवासींचीं मुलें. निजायला शिंदीची चटई कपडे फारसे दिसले नाहींत. मातींची मडकी हीच इस्टेट. एक तरुण तेथें तापानें आजारी होता. मीं त्याच्या अंगाला हात लावला. ताप पुष्कळ असावा. ना पांघरूण ना औषध. ना फळ ना दूध. त्या झोंपडींत निराशा, दारिद्र्य, दैन्य यांचेच राज्य होते.

तेथें एक म्हातारी होती. अस्थिचर्ममय केवळ ती होती. लहानशी चिंधी नेसून होती. तिच्यासमोर एक पाटी होती. पाटींत चिरलेला पाला होता.

“कशाला हा पाला ?” मीं विचारलें.
“हा शिजवतो नि खातो” ती म्हणाली.
“नुसताच पाला ? त्यांत डाळ, तांदूळ, कण्या, कांही तरी मिसळीत असाल.”

“नाही रे दादा. आम्हांला कुठले डाळतांदूळ ? आमची का शेतीवाडी आहे ? थोडी शेती खंडानें करतो. तें भात किती दिवस पुरणार. मजुरी मिळाली तर करावी आणि हा पाला खावा. शेळ्याबकर्‍या पालाच नाहीं का खात ? आम्ही तशीच, पाला थोडाफार मिळतो हीच देवाची कृपा. उद्या पालही घेऊं नका म्हणून जमीनदार म्हणायचा. मग तर हवा खाऊनच राहावें लागेल.”

त्या म्हातारीचें ते शब्द बंदूकींच्या गोळीप्रमाणें हृदयात घुसत गेले. मी खाली मान घातली. क्षणभर तेथे उभा राहून दुसर्‍या झोपडीकडे मी निघालो. तेथेंही तसेच दृश्य. तेथें दोन मायबहिणी कसले तरी कंद विळीवर निशीत होत्या. कसले होते ते कंद ? ती रताळी नव्हती, तो बीट नव्हता. ते बटाटे नव्हते, कांदे नव्हते. ती कणगरें नव्हती, ते करांदे नव्हते. कसले होते ते कंद ?

“कसले हे कंद ?” मी विचारले.
“रानांतून आणले.”
“गोड आहेत वाटतें ? बंघू”
त्या कंदाचा एक तुकडा मोडून मी तोंडात टाकला. तो कडूकडू लागला.
“हे कडू कंद तुम्ही खातां ? रताळी, बटाटे कां नाहीं आणीत ?”

कलिंगडाच्या साली

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
हिमालयाची शिखरे 15 *कलिंगडाच्या साली 1 *कलिंगडाच्या साली 2 *कलिंगडाच्या साली 3 *कलिंगडाच्या साली 4 *कलिंगडाच्या साली 5 *कलिंगडाच्या साली 6 *कलिंगडाच्या साली 7 *कलिंगडाच्या साली 8 *कलिंगडाच्या साली 9 *कलिंगडाच्या साली 10 *कलिंगडाच्या साली 11 *कलिंगडाच्या साली 12 *कलिंगडाच्या साली 13 *कलिंगडाच्या साली 14 *कलिंगडाच्या साली 15 *कलिंगडाच्या साली 16 *कलिंगडाच्या साली 17 *कलिंगडाच्या साली 18 *कलिंगडाच्या साली 19 *कलिंगडाच्या साली 20 *कलिंगडाच्या साली 21 *कलिंगडाच्या साली 22 *कलिंगडाच्या साली 23 *कलिंगडाच्या साली 24 *कलिंगडाच्या साली 25 *कलिंगडाच्या साली 26 *कलिंगडाच्या साली 27 *कलिंगडाच्या साली 28 *कलिंगडाच्या साली 29 *कलिंगडाच्या साली 30 *कलिंगडाच्या साली 31 *कलिंगडाच्या साली 32 *कलिंगडाच्या साली 33 *कलिंगडाच्या साली 34 *कलिंगडाच्या साली 35