Get it on Google Play
Download on the App Store

दुसरा जन्म



परंतु जर व्यक्ती स्मृतीवान असेल तर (चांगला असो व वाईट) तो गाढ निद्रेत जागा होऊन घटनांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तरी देखील तो स्वप्न आणि जागृत अवस्थेत फरक समजू शकत नाही. तो अर्धवट जागा आणि अर्धवट झोपेत असा काहीसा राहतो, परंतु त्याला त्याच्या मृत्यूची माहिती असते. असा व्यक्ती तोपर्यंत दुसरा जन्म घेऊ शकत नाही जोपर्यंत त्याच्या या जन्मातील आठवणी आणि स्मृतींचा नाश होत नाही. अर्थात तरीही काही जण अपवादाने जन्म घेतात, त्यांना पूर्व जन्माची माहिती असते.
परंतु जी व्यक्ती खूपच जास्त स्मृतीवान, जागृत किंवा ध्यानी असेल तिच्यासाठी दुसरा जन्म घी कठीण होऊन बसते कारण प्राकृतिक प्रक्रियेसाठी दुसरा जन्म घेण्यासाठी बेशुद्ध आणि स्मृतीहीन असणे आवश्यक आहे.
यापैकी काही लोक जे फक्त स्मृतीवान असतात, ते भूत, प्रेत किंवा पितर योनीत राहतात आणि जे जागृत आहेत ते काही काळापर्यंत चांगल्या गर्भाची प्रतीक्षा करीत राहतात. परंतु जे केवळ ध्यानी आहेत आणि ज्यांनी गहन ध्यान केलेले आहे ते आपल्या इच्छेनुसार कुठेही आणि केव्हाही जन्म घेण्यासाठी स्वतंत्र असतात. ही प्राथमिक स्तरावर करण्यात आलेली तीन प्रकारची विभागणी आहे. विभाजन आणखीनही असतात ज्यांचा उल्लेख आपल्याला वेदांमध्ये आढळून येतो.