Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 162

“बघूं, आपण विचार करूं. नाहीं तर मी तुमचीं पत्रकं वांटीन. गांवोगांव चिकटवीन. भिंतींवरून, झाडांवरून, सर्वत्र लावीन. चीन देशांत सा-या सजीवनिर्जीव वस्तु प्रचार करीत असतात. विद्यार्थी, स्त्रिया, पुरुष, मुलं सा-यांच्या तोंडावर देशाचीं गाणीं, स्वातंत्र्याचीं गाणीं. त्यांच्या देशांतील भिंतींवरून सार्सापरिलाच्या रक्तदोषांतकाच्या जाहिराती नसतात; तर साम्राज्यशाहीच्या अंताचीं गाणीं लिहिलेलीं असतात. जपानचीं दुष्ट कृत्यें चितारलेलीं असतात. झाडांच्या बुंध्यावरून “जपानी सत्ता नष्ट करा” हे मंत्र चितारलेले असतात. विश्वास, आपल्याकडे तसंच केलं पाहिजे. मी जाईन असं करीत. परंतु मी एकटी जाऊं का ?”

“जा, भीति कसली ? क्रान्तिकारकाला भीति माहीत नसते.”

“विश्वास, अद्याप धैर्य होत नाहीं, परंतु धैर्य केलं पाहिजे.”

इतक्यांत भाईजी बाहेरून आले.

“काय चाललीं आहेत राजाराणीचीं बोलणीं ?” त्यांनीं हंसत विचारलें.

“भाईजी, तुम्ही जाणार ना आम्हांला सोडून ?” हरणीनें विचारलें.

“मी सोडून जाणार यांत आश्चर्य नाहीं. परंतु विश्वासहि तुला सोडून जाणार आहे. हें खरं का ?” भाईजींनीं विचारलें.

“हो, आज ना उद्यां सोडून जाणारच.” हरणी म्हणाली.

“मग लग्न कशाला केलंत ?” भाईजींनीं विचारलें.

“संपूर्णपणें एकमेकांचीं होण्यासाठीं. जगाच्या दृष्टीनंहि एकमेकांचीं होण्यासाठीं. भाईजी, तुम्ही संध्येला भेटून आलेत ?”

“नाहीं; उद्यां जाणार आहें. संध्येला भेटायला अद्याप मला धीर होत नाहीं.”

इतक्यांत विश्वासचे कोणी मित्र आले. विश्वास त्यांच्याबरोबर निघून गेला. कल्याण केव्हांचा बाहेरच गेला होता.

“हरणे, तुला मी काय देऊं ? माग. कांहीं तरी मजजवळ तूं माग. कांहीं तरी तुला द्यावं, असं वाटत आहे.”

“तुमचा आशीर्वाद द्या.”

“असलं शाब्दिक बोलणं नको.”

“मग काय मागूं, भाईजी ? न मागतां तुम्ही सारं देतच आहांत. काय द्यायचं तुम्हीं ठेवलं आहे ?”

“हरणे, माग ना कांहीं तरी.”

“मला रिस्टवॉच द्या. मला फार हौस आहे.”

“खरंच का हौस आहे ? देईन हो.”

“परंतु भाईजी, प्रेमाची भेट जपून ठेवावी लागते. तुमचं घडयाळ राहील का सदोदित मजजवळ ? वेळ आली तर विकूनहि टाकावं लागेल.”

“वीक. परंतु एक माझी आठवण तर राहील ?”

“भाईजी, दुस-या थोडया का आठवणी आहेत तुमच्या ?”

“तें कांहीं असो. मी देईन हो घडयाळ.”

इतक्यांत हरणीची एक मैत्रीण आली.

“भाईजी, मी बाहेर जाऊन येतें हं; तुम्ही कांहीं करूं नका हं; मी येईन लौकरच.” असें म्हणून हरणी गेली. आणि भाईजी एकटेच खोलींत होते. पुन्हां ते लौकरच एकटे निघून जाणार होते. त्यांचें नेहमीचें एकाकी जीवन पुन्हां सुरू होणार होतें. इतके दिवस या मित्रमंडळांत गेले. किती पटकन् गेले दिवस ! किती प्रसंग, किती स्मृति ! ते एकेक गोष्ट आठवूं लागले. त्या तरुण मंडळांत राहून तेहि मनानें जरा तरुण झाले होते. हंसूंखेळूं लागले होते. तेथें राहून त्यांचें कवि-हृदय पुन्हां थोडें जागें झालें होतें. परंतु आतां पक्षी उडून जाणार होता. त्यांना वाईट वाटत होतें. परंतु येथें आतां त्यांना राहवतहि नव्हतें.

दुस-या दिवशी ते संध्येकडे जायला निघाले. जाण्याच्या तयारीनें ते दारांत उभे होते.

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180