Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

५५६१ क्रिस्त पूर्व दिसणारे दृश्य

हे मागे असणे आणि पुढे असणे प्रत्यक्षात किती थोडे आहे ते मात्र लक्षात घायला हवे. (तुलनेसाठी मुंबई लोणावळा यांचे रेखांश पाहिले तर .५८१४ डिग्री येवढा फरक आहे. १डिग्री म्हणजे मिनिटे म्हणजे लोणावळा मिनिटे २० सेकंद मुंबईच्या पूर्वेला म्हणजे पुढे आहे! तेथे सूर्योदय तेवढा वेळ आधी होतो.)

तुलनेने सध्याच्या काळात, अरुंधती फक्त एक मिनिट, १२-१५ सेकंड एवढीच वसिष्ठाचे मागे आहे. ३०००BCE या काळी ती तीन मिनिटे २० सेकंड एवढी जास्तीत जास्त मागे होती तर Epoch of Arundhati या वर उल्लेखलेल्या कालखंडात, साधारण ५५७५ BCE ज्या जवळपास, जे युद्धवर्ष श्री. ओक यानी ठरवले आहे तेव्हां, ती वसिष्ठाच्या फक्त ३०-३५ सेकंड, एवढीच, पुढे चालत होती!

टेलिस्कोप नसण्याच्या त्या प्राचीन काळात व्यासाना किंवा इतर कोणाला हे किंचित – 33 Sec. - पुढे चालणे कसे दिसले असेल व्यासच जाणे! पण दिसले आणि त्यानी लिहून ठेवले आहे हे मोठेच आश्चर्य! पण ज्याअर्थी व्यासानी महाभारतातअरुंधती वसिष्ठाचे पुढे चालत आहेअसा स्पष्ट उल्लेख केला आहे त्याअर्थी भारतीय युद्ध ४५०८ BCE या वर्षानंतर झाले असणे अशक्य आहे असे श्री. ओक यानी प्रतिपादन केले आहे. श्री. ओक यांचा निष्कर्ष पुढेमागे मान्यता पावेल असे माझे मत आहे.