Get it on Google Play
Download on the App Store

कळंबचा श्री चिंतामणी


यवतमाळपासून २० कि.मी. अंतरावर असणारे कळंब श्री चिंतामणी मंदिरामुळे कायम गजबजलेले असते. ऋग्वेदकाळात कळंब हे गाव भदंबपूर या नावाने प्रसिद्ध होते. कळंब येथील मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ३५ फूट खोल कुंडामध्ये हा गणपती आहे. ही गणपतीची मूर्ती दक्षिणमुखी आहे. इंद्राने गौतमऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी इथे गणपतीची तपश्चर्या केली अशी आख्यायिका इथे प्रचलित आहे. चिंता दूर करणार्‍या या चिंतामणीचे दर्शन घ्यायला लोक दूरवरून येतात. इथे गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्दशीपर्यंत उत्सव असतो. या काळात लोकांची अलोट गर्दी या गणपतीचे दर्शन घ्यायला येते.