Get it on Google Play
Download on the App Store

रावण



रावण आयुर्वेदातला ज्ञानी आणि रावण संहितेचा लेखक होता. त्याला रूद्र वीणा वाजवता येत होती. तो वेदांचा अभ्यासक होता आणि सर्व वेद त्याला तोंडपाठ होते. राक्षस असूनही भारत आणि श्रीलंकेच्या बऱ्याच भागात त्याचं पूजन केलं जातं. तो शिवशंकराचा परमभक्त होता आणि त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी त्याने शिव तांडव स्तोत्रही लिहीलं होतं. त्यांने शनीदेवांचा पाय तोडला होता. मरतेवेळीही तो लक्ष्मणाला सत्तेचं ज्ञान देऊन गेला. त्याला ब्रह्मदेवाने आशिर्वाद दिला होता की त्याला देव, दानव, किन्नर किंवा गंधर्व यापैकी कोणीही मारू शकणार नाही. म्हणून विष्णूंना मानवाचा अवतार धारण करावा लागला. त्याने अनेकदा देवतांना पराजित केलं होतं. या सर्व गोष्टी  हे सिद्ध करतात की रावण हा पुराणातला सर्वात शक्तिशाली खलनायक होता.