Get it on Google Play
Download on the App Store

सेटी

सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल इन्टेलीजेन्स (SETI) सौर मालेच्या बाहेर बुद्धिमान जीवनाच्या शोधात लागलेल्या एका समूहाचे नाव आहे. सेटी प्रोजेक्ट वैज्ञानिक क्रियांद्वारे दूर अंतरावरच्या ग्रहांवरील संस्कृती कडून होणाऱ्या विद्युत चुंबकीय संचाराच्या शोधात व्यस्त आहे. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांनी सुरुवातीला याला अनुदान दिले होते, परंतु सध्या खाजगी स्त्रोतांपासून मिळणाऱ्या मदतीवर हा प्रोजेक्ट अवलंबून आहे.

१९५९ मध्ये भौतिक शास्त्रज्ञ गीयुसेप्पे कोकोनी आणि फिलीप मारीशन यांनी एका शोधपत्रात परग्रही संस्कृतीच्या विद्युत चुम्बकीत लहरींना १ आणि १० गीगा हर्ट्झ वर ऐकण्याचा सल्ला दिला होता. १ गिगा हर्ट्झ खालील संकेत गतिमान इलेक्ट्रान द्वारा उत्सर्जित किरणांनी प्रभावित होतील तर १० गिगा हर्ट्झ च्या वरचे संकेत आपल्या वातावरणात असलेला ऑक्सिजन आणि पाण्याच्या अणू द्वारे उत्पन्न होणाऱ्या आवाजाने प्रभावित राहतील.

त्यांनी बाह्य अंतराळातील संकेतांना ऐकण्यासाठी १४२० गिगा हर्ट्झ या आवृत्ती (Frequency) निवडल्या कारण ही सामान्य हायड्रोजन वायूची उत्सर्जन आवृत्ती आहे आणि हायड्रोजन वायू संपूर्ण ब्रम्हांडात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या श्रेणीतील आवृत्तींना "जल विवर" (Watering Hole) असे नाव दिले गेले कारण ही परग्रही संचाराकरिता उपयुक्त होती.

"जल विवर" च्या आसपास बुद्धिमान संकेत ऐकण्याचा प्रत्यत्न निराशाजनक राहिला. १९६० मध्ये फ्रांक ड्रेक ने संकेतांच्या शोधासाठी ग्रीन बॅंक, पश्चिम व्हर्जिनिया इथे २५ मीटरच्या रेडियो दुर्बिणीने प्रोजेक्ट ओझ्मा ची सुरुवात केली. पप्रोजेक्ट ओझ्मा किंवा आणखी कोणत्याही प्रोजेक्टला, जी रात्रीच्या आकाशात संकेत शोधण्यासाठी काम करत असतात, त्यांना आजपर्यंत कोणतेही यश मिळालेले नाही.

१९९५ मध्ये सरकारी अनुदानाच्या कमतरतेमुळे चिंतेत पडलेल्या शास्त्रज्ञांनी धनाच्या खाजगी स्त्रोतांकडे लक्ष वळवण्यास सुरुवात केली. त्यांनी माउन्टेन विउ कैलीफोर्निया मध्ये केंद्रित SETI संस्थानाची स्थापना केली. सेटी ने १२०० पासून ३००० मेगा हर्ट्झ आवृत्तीवर आपल्या जवळच्या १००० सूर्यासारख्या ताऱ्यांच्या अभ्यासासाठी प्रोजेक्ट फिनिक्स चा प्रारंभ केला. डॉक्टर जील टार्टर यांना या प्रोजेक्ट चे निर्देशक बनवण्यात आले. या प्रोजेक्ट मधील उपकरणे २०० प्रकाश वर्षे अंतरावर असलेल्या एखाद्या हवाई अड्ड्यावरून उत्सर्जित झालेले तरंग पकडण्याइतके सक्षम आहेत.

१९९५ पासून SETI संस्थानाने ५० लाख डॉलर प्रतिवर्ष इतक्या बजेट मध्ये एक हजार पेक्षा जास्त ताऱ्यांचा अभ्यास केला आहे, परंतु अजूनपर्यंत कोणताही परिणाम हाती लागलेला नाही. परंतु तरीही खचून न जाता SETI चे वरिष्ठ खगोल शास्त्रज्ञ सेठ शोस्तक यांच्या मते सन फ्रान्सिस्को पासून २५० मैल उत्तरपूर्व इथे बनत असलेल्या ३५० एन्टीना वाल्या एलन दुर्बिणींच्या समूहाकडून २०२५ पर्यंत परग्रही संकेत पकडले जाण्याची आशा आहे.


सेटी @ होम

एक नवीन उपाय म्हणून बार्कले इथल्या कैलीफोर्निया विश्व विद्यालयाचे खगोल शास्त्रज्ञांनी १९९९ मध्ये सेटी @ होम प्रोजेक्ट ची सुरुवात केली आहे. ते अशा लाखो घरगुती कम्प्युटर्स चा वापर कररू इच्छित आहेत जे दिवसातला बहुतांश वेळ रिकामे असतात. जे कोणी या प्रोजेक्ट मध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांना आपल्या संगणकावर एक सॉ

अंतराळातील जीवन-सत्य कि असत्य?- भाग १

passionforwriting
Chapters
महान विचारवंत गीआर्दनो ब्रुनो चित्रपट आणि साहित्य क्षेत्रात मंगळ वासियांचे सत्य एलन हिल्स उल्का परग्रही जीवन यूएफओ पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शास्त्रीय शोध स्टेनली मीलर आणि हैराल्ड उरे द्वारा अरण्यात आलेला प्रयोग ड्रेक चे समीकरण परग्रहावरील संस्कृतीशी संपर्क सेटी अरेसीबो संदेश रहस्यमय Wow संदेश वोयेजर गोल्डन रेकॉर्ड कुठे आहेत ते ? गोल्डीलाक क्षेत्र पृथ्वीवर जीवनासाठी सहाय्यक असणाऱ्या परिस्थिती वर्तमानात परग्रही जीवनाच्या शक्यतेचे आकलन पृथ्वी सारख्या सौर बाह्य ग्रहाचा शोध तरिका संक्रमण विधी पहिला सौरबाह्य ग्रह